मराठा समाजाला ओबीसी दर्जा देण्यास आयोगातील 4 सदस्यांचा होता विरोध  – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

मराठा समाजाला ओबीसी दर्जा देण्यास आयोगातील 4 सदस्यांचा होता विरोध 

मुंबई – मराठा समाजाला ओबीसींचा दर्जा देण्यास मागासवर्ग आयोगातील 9 पैकी 4 सदस्यांचा विरोध असल्याचे समोर आले आहे.  5 विरुध्द 4 अशा मतांनी मराठा आरक्षणाची शिफारस करण्यात आल्याचे समजते आहे. यावरून मागासवर्ग आयोगातच मतभेद असल्याचे उघड झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना आता सुरू झालेल्या या राजकारणावरून वाद चिघळण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाला तामिळनाडूच्या धर्तीवर स्वतंत्र आरक्षण देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास ओबीसी फेडरेशनने विरोध केला आहे. आता मराठा समाजाचा आरक्षण अहवाल बनवणार्‍या राज्य मागासवर्ग आयोगातच यावरून मतभेद असल्याचे समोर आले आहे. मराठे हे क्षत्रिय, राजकीय व सर्वात मोठे जमिनदार होते, त्यामुळे त्यांना ओबीसींचा दर्जा देऊ नये असा विरोध अहवाल तयार करताना आयोगातील काही सदस्यांनी केला होता. मात्र अहवाल तयार झाल्यानंतर अंतिम क्षणाला त्यावर सर्वांच्याच स्वाक्षर्‍या असल्याचेही सुत्रांकडून समजते आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More
post-image
देश

पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

कोलकाता – पश्‍चिम बंगालला गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हिमालयात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदयांना पूर आला आहे. त्याचा तडाखा पश्‍चिम बंगालला बसला...
Read More