मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत जोरदार राडा – eNavakal
महाराष्ट्र

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत जोरदार राडा

औरंगाबाद – मागण्या मान्य न झाल्याने सरकारविरोधात रणशिंग फुंकण्यासाठी औरंगाबादच्या हॉटेल विंडसर कॅसल येथे आज मराठा क्रांती मोर्चाने राज्यस्तरीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीत दोन गटात वाद झाल्याने एकच गोंधळ झाला. या वादाचे चित्रकरण करणार्‍या पत्रकारांना धक्काबुक्की केली.

मागण्या मान्य न केल्याने सरकारने समाजाचा अपमान केला आहे, यामुळे आम्ही सरकारचा निषेध करत आहोत. शासनाने भरतीबाबत काढलेले परिपत्रक मागे घ्यावे, आरक्षणाची अंमलबजावणी करावी, तसेच समाजाच्या 21 मागण्या आचारसंहितेपूर्वी मान्य कराव्यात. अन्यथा मराठा क्रांती मोर्चा सरकारच्या विरोधात भूमिका घेईल, असा इशारा समन्वयकांनी पुन्हा दिला. या बैठकीत सरकारविरोधात आंदोलन करताना कोणते प्रश्न उपस्थित करायचे यावरून दोन गटामध्ये मतभेद झाले आणि सारेच हमरीतुमरीवर आले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन

मुंबई – आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत...
Read More
post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More