मराठा आरक्षण! स्वतंत्र गट करण्याचा निर्णय योग्य! याचिकाकर्त्यांचा दावा – eNavakal
News महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षण! स्वतंत्र गट करण्याचा निर्णय योग्य! याचिकाकर्त्यांचा दावा

मुंबई, प्रतिनिधी- विविध जाती जमातींना दिलेल्या आरक्षणाचा विचार करता मराठा समाजाचा स्वतंत्र गट स्थापन करून त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय योग्यच होता. असा दावा मराठा आरक्षणाचे समर्थन करणार्‍या याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकिल अ‍ॅड. रफीक दाद यांनी केला. मराठा समाजाचा ओबीसी गटात समावेश करण्यास आयोगाच्या चार सदस्यांनी विरोध केला होता. या समाजाचा ओबीसी गटात समावेश केला असता तर आरक्षणाचे प्रमाण कमी झाले असते आणि लोकसंख्या जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली असती म्हणून मराठा समाजाचा वेगळा गट तयार करून आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्यसरकारच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या आणि आरक्षणाला समर्थ देणार्‍या याचिकांवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. यावेळी राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या समर्थनार्थ अभिजित कदम यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर अ‍ॅड.रफीक दादा यांनी याचिकाकर्त्यांनी राज्य सरकारने मराठासमाजाचा स्वतंत्र गट आणि त्यांना दिलेल्या आरक्षणाला घेतलेला आक्षेप खोडून काढला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश संपादकीय

(संपादकीय) लोकसभा निवडणुकीचे भवितव्य ‘ईव्हीएम मशीन’च्या हाती

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागत असताना देशभरातील तब्बल 21 विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिनविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली त्याची कारणे काहीही असतील. तरीसुध्दा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बदलापूरजवळ बिबट्या मृतावस्थेत आढळला

बदलापूर – बदलापूरपासून आठ किलोमीटर लांब असलेल्या ढवळे गावाच्या मागील वनविभागाच्या हद्दीत एक बिबट्या झुडपात मृतावस्थेत आढळल्याचा प्रकार आज समोर आला आहे. या बिबट्याचा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

चार्‍याच्या भाववाढीमुळे पशुपालक शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले

येवला – बळीराजाचे आयुष्यच शेतीशी निगडित असल्याने पावसाच्या कृपेवर आर्थिक गणित अवलंबून असते दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात पिण्याचा पाण्यासोबतच चार्‍याचा प्रश्नही गंभीर झाला आहे हिरव्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात कर्नाटक हापुसचे आक्रमण! स्थानिक बागायतदारांचे नुकसान

मुरुड-जंजिरा – कोकणातील हापुस आंबा आणि त्याची चव प्रसिद्ध आहे. त्या नावाखाली रायगड जिल्ह्यात काही मंडळींनी कर्नाटक हापुस आंबे टनावारी आणले आहेत. यामध्ये रायगडातील...
Read More
post-image
News मुंबई

कांदिवलीत गाडी पार्किंगचा रॅम्प कोसळल्याने 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई- गाडी पार्किंगचा रॅम्प अचानक कोसळल्याने त्याखाली चिरडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार आज कांदिवली परिसरात घडला असून त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली...
Read More