मराठा आरक्षण रद्द करा; इम्तियाज जलील यांची याचिका – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण रद्द करा; इम्तियाज जलील यांची याचिका

मुंबई – राज्य सरकारने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाविरोधात आता एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासोबतच मागासवर्ग आयोगाचा अहवालही रद्द करण्याची मागणी आमदार जलील यांनी केली आहे. अ‍ॅड. सतिश तळेकर यांच्यामार्फत ही याचिका नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. या याचिकेवर 23 जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे. जलील यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, राज्य सरकारने दिलेल्या मराठा समाजाच्या 16 टक्के आरक्षणाला त्वरित स्थगिती द्यावी. तसेच राज्य मागास प्रवर्ग आयोगाचा अहवालही  रद्द करावा.
राज्यातील मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना तो डावलला जात आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाचे आणि यातील काही ठराविक घटकांचे जातीनिहाय सर्वेक्षण करून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुस्लिम वर्गाला तत्काळ आरक्षण मंजूर करावे, असेही या याचिकेत म्हटले आहे. दरम्यान, याआधी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीही मराठा आरक्षणाला आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. राज्य सरकारने 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण जाहीर करणे हे राज्य घटनेविरोधात आहे, अशी भूमिका त्यांनी आपल्या याचिकेत मांडली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषा

भारताची सुवर्णकन्या धावपटू पी. टी. उषा यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म. २७ जून १९६४ रोजी केरळ मधील कुथ्थाली या गावी झाला. पी.टी. उषा हे भारतीय...
Read More
post-image
मनोरंजन

अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने शेअर केला रोमॅण्टिक फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने काल आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिनी बॉलिवूडकडून तंच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर याच खास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत.यापैकी बहुतांश तेलंगणाचे रहिवासी आहेत. या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More