मराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज तयार करू – चंद्रकांतदादा पाटील – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज तयार करू – चंद्रकांतदादा पाटील

औरंगाबाद – राज्य मागास आयोगाने दिलेले अहवाल मराठा आरक्षणाच्या बाजूने सकारात्मक असल्याचे सहकारमंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी म्हटले आहे. सरकारकडून मोठी कायदेशीर फळी उभी करण्यात आली असून आता मराठा समाजाने अजून सहकार्य करावे. आता मोर्चे, उपोषणे करून आरक्षणाच्या कामात अडथळे निर्माण करू नये, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज तयार करू आणि न्यायालयात मराठा आरक्षण टिकवणारच असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वीच राज्य मागास आयोगाने आपला अहवाल सरकारकडे सुपूर्द केला आहे. त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये सरकार आरक्षणाचा मुद्दा कसा हाताळते, त्याचप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळते का, याबाबतची वेगवेगळी मते ऐकायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्य मागास आयोगाचा अहवाल हा मराठा समाजाच्या बाजूने असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे या अहवालाबाबत चंद्रकांत पाटील यांनीही सकारात्मक विधान केले आहे. त्यामुळे आजच्या चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या शक्यतेला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

नागपुरात उच्चशिक्षित डॉक्टरची कुटुंबियांसह आत्महत्या

नागपूर – नागपुरात आज सकाळी सर्वांना धक्का देणारी भीषण दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूरमधील डॉक्टर धीरज राणे त्यांची पत्नी सुषमा राणे, त्यांचा अकरा वर्षाचा...
Read More
post-image
न्यायालय महाराष्ट्र

मराठा आरक्षण हे केंद्राच्या आर्थिक आरक्षणासोबत पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे ऐकले जावे

मुंबई – मराठा आरक्षणासंदर्भात येत्या 25 ऑगस्टला आणि नंतर सप्टेंबर महिन्यात रितसर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते ॲड. विनोद पाटील...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र राजकीय

खा. नवनीत राणा यांना पुन्हा कोरोना! पालिकेने केलेल्या चाचणीत पॉझिटिव्ह

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना नुकताच मुंबईतील लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र डिस्चार्ज दिल्यानंतर...
Read More
post-image
देश शिक्षण

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवरील युक्तिवाद आणखी ३ दिवस चालणार

नवी दिल्ली – देशभरातील विद्यापीठांच्या पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सर्वच राज्यांकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

आयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी ‘ड्रीम ११’ कंपनी २२२ कोटी मोजणार

नवी दिल्ली – यंदा यूएईमध्ये होणाऱ्या बहुप्रतीक्षित आयपीएलला नवा प्रायोजक मिळाला असून ‘ड्रीम ११’ आता आयपीएलची मुख्य प्रायोजक कंपनी असणार आहे. त्यासाठी ‘ड्रीम ११’...
Read More