औरंगाबाद- राज्यभरात मराठा आरक्षण पेटले असताना मराठा समाजातील आणखी एकाने आज या मागणीसाठी आत्महत्या केली. विजयनगर येथील कारभारी दादाराव शेळके या मराठा समाजातील व्यक्तीने आरक्षण मिळावे म्हणून गळफास लावून आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी कारभारी शेळके यांनी चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीमध्ये मराठा आरक्षण आणि श्रीराम फायनान्सकडून कर्जवसुली होत असलेल्या तगाद्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच माझ्या मृत्युनंतर माझ्या मुलांना आरक्षण द्या, अशी मागणी शेळकेंनी चिठ्ठीत केली आहे.