मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही; २ आठवड्यांनी पुन्हा सुनावणी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय महाराष्ट्र

मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही; २ आठवड्यांनी पुन्हा सुनावणी

नवी दिल्ली – मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरवल्यानंतर त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज पहिली सुनावणी झाली असून यावेळी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण दाखल करून घेतले आणि राज्य सरकारला नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती मिळालेली नसून २ आठवड्यांनंतर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे.

‘मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय वैध ठरविला असला तरी हा ४०० पानांचा निकाल आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय झटपट घेता येणार नाही तसेच पूर्वलक्ष्यी प्रभावाने हे आरक्षण लागू करता येणार नाही’, असे म्हणत आज सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी २ आठवड्यांत पुन्हा सुनावणी घेण्यात येईल, असा निर्णय दिला आहे.

मराठा आरक्षणाविरोधात डॉ. जयश्री पाटील यांच्यावतीने वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या या याचिकेत महाराष्ट्र राज्य शासनाने दिलेले आरक्षण हे घटनाबाह्य असून ५० टक्क्याहून अधिक आरक्षण देणे हे संविधानाच्या मूळ तत्त्वाला धक्का लावणारे असल्याचे म्हटले आहे.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More
post-image
देश

पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

कोलकाता – पश्‍चिम बंगालला गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हिमालयात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदयांना पूर आला आहे. त्याचा तडाखा पश्‍चिम बंगालला बसला...
Read More