मराठवाडा, विदर्भाच्या दुष्काळी भागात पाऊस! मुंबईतही बरसला – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठवाडा, विदर्भाच्या दुष्काळी भागात पाऊस! मुंबईतही बरसला

मुंबई – राज्यातील जनता मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होती. अखेर मान्सूनने तळ कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यात हजेरी लावून जनतेला दिलासा दिला. आज देखील विदर्भ आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागांमध्ये पाऊस कोसळत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. परंतु उकाड्याने हैराण झालेल्या, मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना कधी दिलासा मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण सध्या मुंबईकडे पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र होते. मात्र आज मुंबईतही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. येत्या बुधवारी मान्सून पूर्ण राज्य व्यापणार अशी शक्यता रविवारी हवामान विभागाने वर्तविली असल्याने मुंबईकरांची चिंता काही अंशी कमी झाली आहे.

पंढरपूरसह मराठवाड्यातील जालना, लालसगाव, अमरावती, चाळीसगाव, पुणे, सांगली, नागपूर यांसारख्या परिसरात पावसाने बरसायला सुरुवात केली. तर दोन-तीन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळसह किनारपट्टी परिसरात मान्सून दाखल झाला. येत्या बुधवारपर्यंत मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

 

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद हुकले! सिंधूचा पराभव

जकार्ता – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम स्पर्धेत तिचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

धोका पत्करायचा नाही म्हणून सेनेशी युती

मुंबई – भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपा कार्यकारिणीत म्हणाले की, युती होणार का? कोणत्या जागा कुणाला सोडणार? हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

ताज हॉटेलजवळील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई – कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर असे या व्यक्तीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कर्णधारपद कोहलीकडेच

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१...
Read More