रुग्णालयात पोलीस अधिकारी तैनात! नातेवाईकांच्या प्रवेशाला अंकुश लावणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या आंदोलन आरोग्य देश

रुग्णालयात पोलीस अधिकारी तैनात! नातेवाईकांच्या प्रवेशाला अंकुश लावणार

कोलकाता- पश्‍चिम बंगालमधील संपकरी डॉक्टरांच्याविरोधात राज्यभर रुग्णांचा व जनतेचा संताप वाढू लागल्याने आज डॉक्टरांच्या 24 प्रतिनिधींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी प्रथमच चर्चा केली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी पश्‍चिम बंगालच्या सर्व रुग्णालयात 24 तास पोलीस अधिकारी तैनात ठेवण्याचे व रुग्णांच्या नातेवाईकाच्या संख्येवर अंकुश ठेवण्याची हमी दिली. तसेच डॉक्टरांवर हल्ले करणार्‍यांना कठोर शासन करण्याचे आश्‍वासन दिले.
ममता बॅनर्जी यांनी आज ‘नबाना’ या राज्याच्या सचिवालयात डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी कोलकात्याच्या ‘एनआरएस’ रुग्णालयात डॉक्टराला झालेल्या मारहाणीचा निषेध केला. तसेच डॉक्टरांच्या सर्व मागण्यांवर चर्चा केली. काही मागण्या मान्य केल्या.
संपकरी डॉक्टरांची व ममता बॅनर्जी त्यांच्यातील चर्चा दूरचित्र वाहिन्यांच्या समोर झाली, ही चर्चा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झाली. ममता बॅनर्जी यांनी मला डॉक्टरांचा अभिमान वाटतो, असे सांगितले. तर संपकरी डॉक्टरांनी सांगितले की, ममता या आमच्या पालक असून त्यांचा हेतू अत्यंत चांगला आहे.
दरम्यान, भारताच्या इंडियन मेडीकल असोसिएशनने 24 तासांचा देशव्यापी संप केल्याने देशभरातील रुग्णांचे अतोनात हाल झाले. त्यात खासगी दवाखाने चालविणारे डॉक्टर सहभागी झाल्याने रुग्णांच्या हालाला पारावार उरला नाही. दिल्लीतील ‘एम्स’चे डॉक्टर संपात सहभागी नव्हते. मात्र इंडियन मेडिकल असोसिशनचे देशभरातील डॉक्टर सभासद आहेत. त्यामुळे रुग्णसेवेवर प्रचंड परिणाम झाला. एकट्या महाराष्ट्रात 20 ते 25 हजार डॉक्टर संपावर असल्याने रुग्णाचे हाल झाले. महाराष्ट्रासहीत देशभरातील रुग्णालयातील ओपीडी, एक्सरे, डायलिसिस, रक्त-लघवी चाचणी व साध्या शस्त्रक्रिया करणारे विभाग बंद होते. दिल्ली शहरात केजरीवाल यांनी सुरू केलेले ‘मोहल्ला’ क्‍लिनिक मात्र
सुरू होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

पावसामुळे अजित पवारांचा हडपसरमधील रोड शो रद्द

पुणे – आज सायंकाळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत आहे. त्यामुळे आजच्या दिवसात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सर्वच पक्ष सज्ज आहेत. मात्र अनेक ठिकाणी सुरू असलेल्या...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More