ममता बनर्जींचे धरणे आंदोलन मागे – eNavakal
आघाडीच्या बातम्या आंदोलन देश

ममता बनर्जींचे धरणे आंदोलन मागे

कोलकाता – शारदा चिटफंड घोटाळ्यात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना अटक करण्यास सीबीआयला मनाई करणारा आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीन दिवसांपासून सुरू असलेले आपले धरणे आंदोलन मागे घेतले आहे. हे धरणे आंदोलन राज्यघटना आणि लोकशाहीचा विजय आहे. त्यामुळे आपण धरणे आंदोलन थांबवत असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत ममता बॅनर्जी यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले. सुप्रीम कोर्टाने आज सकारात्मक निर्णय दिला. पुढच्या आढवड्यात आम्ही आमची बाजू पुन्हा एकदा मांडणार आहोत, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

महाजनादेश यात्रेवर कांदे फेकण्याचा इशारा; आंदोलनकर्ते ताब्यात

नाशिक – महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच सांगलीत घडलेली असताना महाजनादेश यात्रेच्या वाहनांवर कांदे फेकण्याचा आणि यात्रा...
Read More
post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More