मनोहर पर्रीकरांनी राजीनामा द्यावा अन्यथा आमरण उपोषण करू – राष्ट्रवादी – eNavakal
आघाडीच्या बातम्या आंदोलन राजकीय

मनोहर पर्रीकरांनी राजीनामा द्यावा अन्यथा आमरण उपोषण करू – राष्ट्रवादी

म्हापसा – गेल्या कित्येक महिन्यांपासून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजाराने त्रस्त असून त्यांच्या अनुपस्थितीत राज्याच्या कारभाराकडे दुर्लक्ष होत आहेत. यामुळे राज्यावर कर्ज वाढत आहे. यामुळे, मुख्यमंत्र्यांनी पंधरा दिवसांत राजीनामा द्यावा, अन्यथा, पणजीच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव संजय बर्डे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे प्रस्तावांवर आणि निर्णयांवर मंजूरी मिळवण्यासाठी अधिकारी आणि मंत्र्यांना दिल्लीत जावे लागते. लोकांच्या वर्गनिधीतुन जमा झालेल्या पैशांची उधळण सुरू आहे, मुख्यमंत्र्यांनी गोव्यात येऊन उपचार सुरू करावेत, असा सल्लाही पत्रकारांशी बोलताना बर्डे यांनी पर्रीकरांना दिला आहे.

कॉंग्रेसच्या काळात राज्यातील कर्जाचा आकडा ४ ते ५ कोटी रुपयापर्यंत होता, मात्र, भाजपाच्या काळात तोच आकडा १८ कोटी रूपयांपर्यंत गेल्याचा दावा संजय बर्डे यांनी केला आहे. राज्यासाठी केंद्राकडून ३० हजार कोटींचा विकास निधी मिळाला आहे, तसेच राज्यात लागू केलेल्या विविध प्रकारचा करही सरकारच्या तिजोरीत जमा झाला असूनही राज्यावरील कर्जाची रक्कम वाढण्याची कारणे द्यावीत, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

के. चंद्रशेखर राव उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता

हैदराबाद – तेलंगणामध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव उद्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

#ElectionResults2018 कोण होईल मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या पाच राज्यांपैकी फक्त तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

लोणावळ्याची ‘मगनलाल’ चिक्की बंद होणार ?

लोणावळा – लोणावळ्याच्या प्रसिद्ध चिक्कीचे उत्पादक असलेल्या ‘मगनलाल’ चिक्कीला अन्न व औषध प्रशासनाने दणका दिला आहे.  ‘मगनलाल’ चिक्की पैकी एक ‘मगनलाल फूड प्रोडक्ट्स’ या कंपनीला...
Read More
post-image
महाराष्ट्र

खासदार राजेंद्र गावितांना शिवीगाळ; ५ जणांना अटक

पालघर – पालघरचे भाजप खासदार राजेंद्र गावित सकाळी जॉगर्स पार्कला मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना काही अज्ञातांनी शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. गावितांच्या तक्रारीवरून पोलिसांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात हुडहुडी वाढली

महाबळेश्वर – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारठा वाढला आहे. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना गुलाबी थंडी अनुभवायला मिळाली आहे. महाबळेश्वमधील वेण्णा लेक येथे तापमानात घट झाल्यामुळे दवबिंदू बघायला मिळाले...
Read More