मनेका गांधींची पुन्हा धमकी मतांच्या संख्येनुसार गावांची श्रेणी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

मनेका गांधींची पुन्हा धमकी मतांच्या संख्येनुसार गावांची श्रेणी

सुल्तानपूर (उत्तर प्रदेश) – भाजपाच्या केंद्रीय मंत्री आणि मातब्बर गांधी घराण्यातील धाकटी सून असणार्‍या मनेका गांधी यांनी पुन्हा वादग्रस्त विधानकेले आहे. मनेका गांधी यांनी जवळजवळ मतदारांना धमकीच दिली. त्या म्हणाल्या, ‘ज्या विभागातून मला जास्त मते मिळतील त्या ठिकाणीच मी जास्त काम करेन’, मनेका गांधी यांनी मत देणार्‍यांच्या संख्येनुसार गावांची श्रेणीच तयार करण्याची जणू धमकी दिली आहे.
यापूर्वी सुल्तानपूरच्या प्रचारसभेत मनेका गांधी  म्हणाल्या होत्या की, ‘मी निवडणूक जिंकणारच आहे. मात्र हा विजय मुस्लीम मतांशिवाय असला तर मला आनंद वाटणार नाही. माझे मन खट्टू होईल. मुसलमान माझ्याकडे कामे घेऊन आले तर मग मला विचार करावा लागेल. कारण आम्ही काही महात्मा गांधींची औलाद नाही. मी दोस्तीचा हात घेऊन आले आहे. मी खुल्या मनाने आली आहे. मी तर जिंकणारच आहे. त्यानंतर तुम्हाला माझी गरज पडेलच. त्यानंतर कालच्या सभेत त्यांनी मतांच्या संख्येनुसार विभागांची वर्गवारी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘प्रत्येक बुथवरील मतदानाचा आकडा आम्हाला कळतो. त्या बुथवर 100 मते, 50 मते मिळाली त्याप्रमाणे मी श्रेणी तयार करेन व त्या लोकांची तसतशी
कामे करीन.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More