मनसे कार्यकर्त्यांनी अदानी इलेक्ट्रिसिटी फलकावर लिहिले अदानी चोर है! घोषणा दिल्या ‘सरकार चोर है’! – eNavakal
महाराष्ट्र

मनसे कार्यकर्त्यांनी अदानी इलेक्ट्रिसिटी फलकावर लिहिले अदानी चोर है! घोषणा दिल्या ‘सरकार चोर है’!

मुंबई – पश्चिम उपनगरातील लाखो वीज ग्राहकांना दहा-दहा पट वीज बिले देणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीला यापूर्वी निवेदन देऊनही ग्राहकांना भरमसाठ वीज बिले येतच आहेत. म्हणून आज मनसे कार्यकर्त्यांनी बोरिवली पश्चिम येथील देविदास लेनवरील अदानी इलेक्ट्रिसिटीच्या मुख्यालयावर पुन्हा एकदा मोर्चा वळविला. या मनसे कार्यकर्त्यांनी अदानी इलेक्ट्रिसिटीच्या मुख्य फलकालाच काळे फासले व त्यावर लिहिले ‘अदानी चोर है’. त्यानंतर या मनसे कार्यकर्त्यांनी अदानीच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच ‘सरकार चोर है’ अशाही घोषणा दिल्या.

मनसे सरचिटणीस नयन कदम यांच्या नेतृत्त्वाखाली २० ते २५ पदाधिकाऱ्यांनी आज बोरिवली पश्चिम येथील अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयावर धडक दिली. मात्र अदानी इलेक्ट्रिसिटीचे कार्यालय बंद होते व मुख्य प्रवेशद्वारही बंद करण्यात आले होते. त्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अदानी इलेक्ट्रिसिटीच्या मुख्य फलकाला काळे फासून त्यावर ‘अदानी चोर है’ असे वारंवार लिहिले. त्यानंतर अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालया भोवतीच्या कंपाउंड वॉलवर सर्वत्र अदानी चोर है, अदानी चोर, अदानी चोर, असे सर्वत्र काळ्या अक्षराने रंगवून ठेवले. यावेळी ‘अदानी चोर है’ अशा घोषणाही देण्यात आल्या. काही मनसैनिकांनी तर त्यासोबत ‘सरकार चोर है’ अशा घोषणा दिल्या.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मनसे कार्यकर्त्यांनी अदानी इलेक्ट्रिसिटी फलकावर लिहिले अदानी चोर है! घोषणा दिल्या ‘सरकार चोर है’!

मुंबई – पश्चिम उपनगरातील लाखो वीज ग्राहकांना दहा-दहा पट वीज बिले देणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीला यापूर्वी निवेदन देऊनही ग्राहकांना भरमसाठ वीज बिले येतच आहेत....
Read More
post-image
महाराष्ट्र

वेदगंगेला महापूर; ५ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर – पाटगाव धरणक्षेत्रात होत असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीला महापूर आला आहे. निपाणी-राधानगरी मार्गावर निढोरी येथे वेदगंगा नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने येथून...
Read More
post-image
मुंबई

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ८२ टक्के पाणीसाठा

मुंबई – मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या परिसरात अधूनमधून दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज सकाळी सातही...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल यांना कोरोनाची लागण

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचा तपासणी अहवाल आज मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मित्तल यांची काल रॅपिड टेस्ट...
Read More
post-image
मुंबई

जुहूमधील बिल्डरची घरासमोरच धारदार शस्त्राने वार करून हत्या

मुंबई – मुंबईतील पुनर्वसन प्रकल्पातून निर्माण झालेल्या वादातून जुहूमधील बिल्डर अब्दुल मुनाफ शेख (५५) यांची घरासमोरच धारदार शस्त्राने डोक्यावर, पोटावर आणि छातीवर वार करून...
Read More