सत्ता आणि पैशासाठी शिवसेना-भाजप एकत्र – राज ठाकरे – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

सत्ता आणि पैशासाठी शिवसेना-भाजप एकत्र – राज ठाकरे

रायगड – लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदी विरोधी भुमिका घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील शेवटची सभा आज रायगड मध्ये पार पडली. रायगड जिल्ह्यातील महाड येथील चांदे मैदानात ही सभा सुरू होती. सभेमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. इतर सभांप्रमाणेच यावेळी सुद्धा राज ठाकरेंनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत मोदींच्या जुन्या भाषणांच्या क्लिप्स दाखवल्या. मोदींनी पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासन आणि आताची प्रत्यक्ष परिस्थिती यामधील फरक त्यांंनी मतदारांना दाखवून दिला.

शिवसेना-भाजप दोन्ही लाचार

शिवसेना-भाजपने एकमेकांना शिव्या दिल्या आणि पुन्हा युती केली. कारण दोन्ही पक्ष लाचार आहेत. पैसे आणि सत्ता ह्यासाठी ते वाट्टेल त्या तडजोडी करतील, असा टोला त्यांनी लगावला. कोकण केरळपेक्षा पुढे आहे. केरळ पर्यटनात कुठे गेलं आणि कोकण मागेच राहिला. तरीही ह्याच इथल्या लोकप्रतिनिधीना काही घेणं देणं नाही. कोकणाची पर्यटनाची क्षमता इतकी अफाट आहे की, इथले तीन जिल्हे संपुर्ण महाराष्ट्राची काळजी घेऊ शकतात, असे राज ठाकरे म्हणाले.

निवडणुकांसाठी काळा पैसा आला कुठून?

यासोबतच राज ठाकरे यांनी नोटाबंदी आणि मेक इन इंडियावरून मोदींवर निशाणा साधला. ‘गेले ५ वर्ष हा देश नरेंद्र मोदी आणि अमित शाह चालवत आहेत. आणि अगदीच तोंडदेखलं अरुण जेटलींना बोलवतात. नोटबंदीसारखा निर्णय लहरीपणातून घेतला. नोटबंदीतून जर काळा पैसा बाहेर काढायचा होता, तर मग भाजपकडे निवडणुका लढवायला जो वारेमाप काळा पैसा आलाय तो कुठून आला? नोटबंदीच्या आधी जितकं चलन बाहेर फिरत होतं त्याच्याहून जास्त चलन आत्ता बाहेर फिरतयं, असे रिझर्व बँकेच्या नुकत्याच आलेल्या अहवालात सांगितलं. मोदी नोटबंदीच्या दरम्यान म्हणाले होते, जर नोटबंदी फसली तर मला भर चौकात शिक्षा द्या. आता मोदींनी सांगायच कुठला चौक निवडायचा?’ असा सवाल त्यांनी विचारला.

मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाची पोल खोल

‘मोदींनी खासदार म्हणून जे गाव दत्तक घेतलं त्या गावाचा विकास झालेला नाही. गावात एकही सुविधा नाही. गावातले साधे नाले साफ नाहीत तर गावात महाविद्यालय नाही, दवाखान्याची सोय नाही. स्वतः जे गाव दत्तक घेतलं ते जर तुम्ही नीट करु शकत नाहीत. तर देशाचं काय भलं करणार’, असा टोला त्यांनी मोदींना लगावला. एका आठवडयात साडेआठ लाख संडास बांधले.  म्हणजे मिनिटाला ३४ संडास बांधले. सेकंदाला सात संडास बांधले. इतक्या लवकर संडास बांधू कसे शकतात, असे ही ते म्हणाले.

कॅशलेस गावाचे धक्कादायक वास्तव

‘1930 ला हिटलरने जर्मनीत जे करण्याचा प्रयत्न केला तोच प्रयत्न मोदी 2014 पासूून भारतात करत आहेत. धसई हे देशातील पहिले कॅशलेस गाव असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र त्या गावात एकच राष्ट्रीयकृत बॅंक आहे. त्यामुळे तेथे सर्व व्यव्हार रोख होतात’. हे राज ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले. नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत काहीच केले नाहीये, म्हणून ते पुलवामा जवानांच्या नावे मतं मागत आहेत. ्असे ही ते म्हणाले. राज ठाकरे हे मोदी आणि भाजप सरकार विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार सभा घेत आहेत. आतापर्यंत नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात राज ठाकरे यांच्या सभा झाल्या आहेत. त्यानंतर आज रायगडात राज गर्जना झाली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More