मनसेच्या पत्रकार परिषदेला शिवसेना घाबरली – संदिप देशपांडे – eNavakal
आघाडीच्या बातम्या आंदोलन मुंबई राजकीय

मनसेच्या पत्रकार परिषदेला शिवसेना घाबरली – संदिप देशपांडे

मुंबई- मुंबई महापालिकेतील पत्रकार भवनात मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे आज पत्रकार परिषद घेणार होते. पण या परिषदेला परवानगी नाकारल्याने वाद तयार झाला आहे.  जनसंपर्क अधिकारी विजय खबाळे यांच्या कक्षात संदिप देशपांडे यांनी धडक मारत जाब विचाला आणि यासर्व प्रकारामागे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव असल्याचा आरोप संदिप देशपांडे यांनी केला आहे.

मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे एका आरक्षित भुखंडाबद्दल पत्रकार परिषद घेणार होते. मात्र इथे पत्रकार परिषदेला परवानगी नसल्याचे कारण देत जनसंपर्क विभागाने या कक्षाला कुलप लावले आहे. तसेच महापालिकेच्या प्रवेशद्वारावर बंदोबस्तही वाढवला आहे.

आज पहिल्यांदा शिवसेनेला कुणाच्यातरी पत्रकार परिषदेला घाबरलेलं पाहिलं आहे. पत्रकार परिषद आहे हे माहित असुनही जनसंपर्क कार्यालयाने  मुद्दाम पत्रकार कक्षाला कुलूप लावला आहे. शिवसेना आम्हाला घाबरली कारण त्यांच्या मनातच काळंबेरं आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या सांगण्यावरुन जनसंपर्क कार्यालयाने ही पत्रकार रोखली आणि पत्रकार कक्षाला टाळे लावले आहेत, असा आरोप संदिप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

केंद्रीयमंत्री अनुप्रिया पटेलने भाजपाची साथ सोडली

लखनऊ – केंद्रीय मंत्री व अपना दलाच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनी भाजपाची साथ सोडली आहे. भाजपाने आमच्या सहकार्‍यांना सांभाळून घेतले नाही. आमच्या तक्रारीचे निरसन...
Read More
post-image
News देश

सराफांच्या भिशीवर बंदी सरकारने अध्यादेश काढला

नवी दिल्ली- दाग-दागिने विकणार्‍या सराफांच्या भिशीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तसा अध्यादेशच आज सरकारने काढला. या अध्यादेशान्वये सराफ चालवत असलेल्या अल्पबचत योजनेवर बंदी...
Read More
post-image
News मुंबई

शक्ती मिल बलात्कार प्रकरण! हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यात फाशी नाही, तर बलात्कारात का?

मुंबई- एखाद्याची हत्या करणे अथवा शरीराचा एखादा भाग धडापासुन वेगळा करणे अशा अमानवी स्वरूपाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षेची तरतूद नाही . त्या मुळे हत्ये पेक्षा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईत बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प

वसई – बीएसएनएलच्या इंटरनेटचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे वसईतील दस्त नोंदणी रखडत चालली असून त्याचा फटका मात्र दररोज नोंदणी कार्यालये व त्याच्या लाखो...
Read More
post-image
News मुंबई

पालिकेचा केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ पुरस्काराने सन्मान

मुंबई – पालिकेद्वारे नागरिकांना देण्यात येणार्‍या विविध सेवा सुविधा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, विविध परवानग्या, दाखले, अनुज्ञप्ती पत्रे यासारख्या सेवा सुविधा माहिती...
Read More