मनसेचा सरकारवर हेरगिराचा आरोप – eNavakal
News मुंबई राजकीय

मनसेचा सरकारवर हेरगिराचा आरोप

मुंबई –  भाजप सरकार आमच्यावर हेरगिरी करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून  करण्यात आला.  मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज राजगड येथे पत्रकार परिषद संपल्यानंतर मनसेच्या नेत्यांची आपापसात बोलणी सुरू होती. त्यावेळी एक व्यक्ती मोबाईलवरून या सगळयाचे शुटिंग करत असल्याचे मनसेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. या व्यक्तीला कार्यकर्त्यांनी हटकले असता त्याने सुरूवातीला आपण औरंगाबाद येथील अप्रेंटिस असल्याचे सांगितले. मात्र, तरीही मनसेच्या कार्यकर्त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी या व्यक्तीची अधिक चौकशी केली. तू अप्रेंटिस असला तरी बैठकीचे शुटिंग कशासाठी करत आहेस, असे विचारल्यानंतर या व्यक्तीची भंबेरी उडाली. कार्यकर्त्यांनी त्याचा मोबाईलही ताब्यात घेऊन तपासायला सुरूवात केली. तेव्हा त्यामध्ये पत्रकार परिषदेचा व्हीडिओ आढळून आला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर या व्यक्तीने आपण रेल्वे पोलीस गुप्तचर खात्यामध्ये कामाला असल्याची कबुली दिली. आपले आडनाव जाधव असल्याचेही त्याने सांगितले. वरिष्ठांनी मला मनसेच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे आदेश दिले होते. यानंतर  या पोलीस कर्मचार्‍याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोडून दिले. आम्ही याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात धाव घेतली असता, तेथील पोलिसही आमची तक्रार दाखल करुन घेत नसल्याचे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यातील ९ जिल्ह्यांत एकही कोरोना रुग्ण नाही

नांदेड – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला एकही रुग्ण नाही. असे असले तरी आणखी काही दिवस याठिकाणच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा जाहीर

मुंबई – राज्यातील जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा यादी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केली आहे. ही यादी पुढीलप्रमाणे –...
Read More
post-image
महाराष्ट्र

पुण्यात कोरोनाचा विळखा वाढला, अनेक पेठा सील

पुणे – देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशातील कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोना वेगाने पसरतोय. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका प्रशासन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

देशभरात 4,281 कोरोनाग्रस्त! राज्यात ८६८ रुग्ण

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

Corona: साडेपाच लाख बेघर मजुरांना अन्नवाटप- मुख्यमंत्री

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये एकूण ४६५३ मदत केंद्रे स्थापन केली आहेत. यामध्ये ४,५४,१४२ स्थलांतरित मजूर आणि कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे...
Read More