मनवेलपाडा शिवशक्ति चाळीतील पिण्याच्या पाण्यात रक्त आणि मांस – eNavakal
आघाडीच्या बातम्या आरोग्य गुन्हे महाराष्ट्र मुंबई

मनवेलपाडा शिवशक्ति चाळीतील पिण्याच्या पाण्यात रक्त आणि मांस

विरार – विरार पुर्व येथील मनवेलपाडा तलावाशेजारील शिवशक्ति चाळीत आज सकाळी पिण्याच्या पाण्यावरुन च्रर्चा सुरु होती.  चाळीत आलेल्या पिण्याच्या पाण्यात रक्त, मांस, बकऱ्याची विष्ठा आणि केस आल्याने रहिवाशांत भीतीचे वातावरण तयार झाले हौते.
स्थानिकांनी या बाबत पाहणी केली असता,  जवळच्याच “तनुष्का”  मटन शॉपवाल्याने गटारावाटे मुख्य जलवाहिनीतून बेकायदा पाण्याचे कनेक्शन घेतले होते, या कनेक्शनला पाणीपंप लावून मटन शॉपचा मालक उमेश कलाल पाणी खेचत होता. मात्र या पाण्याच्या कनेक्शनचा पाइप निघाल्याने मटन शॉपमधून निघणारे बकऱ्याचे रक्त, मांस आणि विष्ठा मुख्य जलवाहिनीत मिसळली गेली. दरम्यान, रहीवाशांनी स्थानिक नगरसेविका “संगीता भेरे” यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. ही बाब नागरिकांच्या समजन्यात येताच, मटन शॉप मालक “उमेश कलाल”  हा पसार आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी निरारकरांची तारेवरची कसरत सुरु असतानाच असा संतापजनक प्रकार समोर आला आहे, त्यामुळे विरारकरांना पिण्याच्या पाण्यासोबतच आता पाण्याच्या स्वच्छतेचा प्रश्नही तितकाच भेडसावत आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

#MeToo यशराज फिल्म्सच्या उपाध्यक्षकाची पदावरून हकालपट्टी

मुंबई – #MeToo मोहिमेंतर्गत यशराज फिल्म्सचे उपाध्यक्ष आशिष पाटील यांना पदावरून काढण्यात आले आहे. एका महिलेने आशिष पाटीलवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पाटील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

ठग्स ऑफ हिंदुस्तानचे ‘वाश्मल्ले’ गाणे पाहिले का?

मुंबई – बिग बी अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान’ हे दोघे पहिल्यांदाच ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटाच्या माध्यमातून सोबत काम करत आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दिवाळीत साखर स्वस्त होणार

मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळ निघत अशी आरडाओरड करणाऱ्या रेशनकार्ड धारकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. साखर आणि डाळीच्या दरात घट करण्यात आली असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात वाढ

दिल्ली – केंद्र सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के इतकी वाढ केली आहे. यामुळे व्याजदर...
Read More