‘मनमर्जियां’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला – eNavakal
देश मनोरंजन

‘मनमर्जियां’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई – अभिषेक बच्चन, तापसी पन्नू, विकी कौशल यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘मनमर्जियां’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये विक्की कौशल, तापसी पन्नू आणि अभिषेक बच्चन मजेदार अंदाजात दिसत आहेत. पण यातील विक्की कौशलचा अंदाज जरा हटकेच आहे. या सिनेमात तापसी पन्नूने रुमी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तर विक्की कौशलच्या भूमिकेचे नाव विक्की आहे. ‘मनमर्जियां’च्या ट्रेलरमधून प्रेमाकडे अगदी वेगळ्याच आणि सहज दृष्टीकोनातून पाहणाऱ्या प्रेमी युगुलापासून ते आपल्याला काय साथ देईल अशा साथीदाराच्या शोधात निघालेल्या व्यक्तीपर्यंत तीन वेगवेगळ्या व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.

तगड्या कलाकारांची जोड पंजाबची पार्श्वभूमी आणि त्याला प्रेमाची जोड देत साकारण्यात आलेल्या कथानकाला मिळाल्यामुळे हा चित्रपट कुतूहलाचा विषय ठरत आहे. त्यातूनही या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल दोन वर्षांनंतर अभिनेता अभिषेक बच्चन पुन्हा एकदा रुपेरी पडद्याकडे वळला आहे. त्यामुळे ही त्याच्यासाठीसुद्धा एक महत्त्वाची संधी ठरली आहे. विकी कौशल आणि तापसी पन्नू यांचा अभिनय या ट्रेलरची जमेची बाजू ठरत आहे. प्रेम करण्यात जितका पुढे तितकाच जबाबदाऱ्या आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या बाबतीत मागे राहणाऱ्या एका पंजाबी तरुणाच्या भूमिकेत तो दिसत आहे. तर तापसी याच तरुणावर जिवापाड प्रेम करणाऱ्या त्याच्या ‘डॅशिंग’ प्रेयसीची भूमिका साकारत आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

गॅरी स्टेड नवे प्रशिक्षक

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांचे माजी फलंदाज गॅरी स्टेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिन्यात अगोदरचे प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांनी...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार

मुंबई- म्हाडाची मुंबई शहरसाठी अंदाजे एक हजार घरांची ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघाणार असल्याची शक्यता मुंबई मंडळाच्या कार्यालयातून वर्तविण्यात आली आहे. म्हाडाच्या गृहनिर्माण कोकण मंडळाने मुंबई...
Read More
post-image
News मुंबई

पालिका एच-पूर्व कार्यालयाची ‘पाणी वाचवा’ मोहीम कागदावर

मुंबई- पिण्याचे पाणी वाचवा चोरी रोखा पाणी वाया घालवू नका, अशी जनजगृती मोहीम पालिका एच – पूर्व कार्यालयचे पाणी खाते हाती घेणार होते. पण ही...
Read More
post-image
क्रीडा विदेश

मुरलीने ब्लादिमीरला नमवले

अबुधाबी – अबुधाबी आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या मुरली कार्तिकेयनने सातव्या फेरीत रशियाच्या ब्लादिमीरला फेडोसीवला पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली. या पराभवामुळे स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीमधून...
Read More
post-image
News मुंबई

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई – भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील...
Read More