मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, पश्चिमवर जम्बोब्लॉक – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, पश्चिमवर जम्बोब्लॉक

मुंबई – मध्य रेल्वेच्या उपनगरीय खंडावर अनुरक्षण कार्य करण्यासाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.30 पासून ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक राहणार आहे. तसेच पनवेल ते वाशी अप-डाऊन हार्बर मार्गावरही सकाळी 11.30 वा.पासून सायंकाळी 4 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणांच्या दुरुस्तीसाठी पश्‍चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ-गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी 10.35 वा.पासून ते दुपारी 3.35 वा.पयर्र्ंत अप-डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक काळात अप-डाऊन जलद मार्गावरील लोकलना सांताक्रुझ-गोरेगांव स्थानकांदरम्यान अप-धीम्या मार्गावर चालविण्यात येतील.

मध्य रेल्वेवर सकाळी 10.37 पासून दुपारी 3.06 वाजेपर्यंत कल्याणहून सुटणार्‍या अप जलद मार्गाच्या सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर चालविण्यात येतील आणि सर्व स्थानकांवर थांबतील. त्यानंतर ठाणे आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान आपल्या निर्धारित अप जलद मार्गावर चालविण्यात येतील. या सेवा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा स्थानकावर थांबतील. तसेच या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटे उशिरा शेवटच्या स्थानकांवर पोहचतील. तर सकाळी 11.06 वाजल्यापासून ते दुपारी 04.01 वाजेपर्यत पनवेलहून सीएसएमटीसाठी आणि सकाळी 10.03 ते दुपारी 3.16 वाजेपर्यत वाशीहून पनवेल, बेलापुर येथे जाणार्‍या सर्व उपनगरीय सेवा रद्द राहणार आहेत. या ब्लॉक काळात सीएसएमटी-वाशी खंडावर विषेश लोकल चालविण्यात येणार आहे. सकाळी 11.12 वा.पासून ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्यासाठी आणि सकाळी 11.14 ते दुपारी 3.29 वाजेपयर्र्ंत ठाण्याहून पनवेलसाठी सुटणार्‍या ट्रांसहार्बर मार्गाच्या सेवाही रद्द राहणार आहेत. सकाळी 11.45 वा.पासून दुपारी 2.45 वा.पर्यंत नेरूळहून खारकोपरसाठी सुटणार्‍या डाऊन आणि सकाळी 12.15 वा.पासून दुपारी 3.15 वा.पर्यंत खारकोपरहून नेरूळसाठी सुटणार्‍या अप सेवा रद्द राहतील. ब्लॉक काळात बेलापुर आणि खारकोपर दरम्यान सर्व सेवा निर्धारित वेळेप्रमाणे चालविण्यात येतील.

आसनगाव-कसारादरम्यान ट्रॅफिक आणि पावर ब्लॉक

रविवार, 10 नोव्हेंबर आणि रविवार 17 नोव्हेंबरला मध्य रेल्वेच्या आसनगाव-कसारा स्थानकांदरम्यान ट्रॅफिक आणि पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 वा.पयर्र्ंत आसनगाव आणि कसारा दरम्यान अप-डाऊन मार्गावर 2 टन ब्रॉड फ्लैंज बीम ऑफ-लोडेड पोर्टलला हटविण्यासाठी ट्रॅफिक आणि पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More