मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवार 10 नोव्हेेंबरला मेगाब्लॉक – eNavakal
News मुंबई

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवार 10 नोव्हेेंबरला मेगाब्लॉक

मुंबई- मध्य रेल्वेच्या उपनगरीय खंडावर अनुरक्षण कार्य करण्यासाठी रविवार 10 नोव्हेेंबर 2019 रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.30 पासून ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक राहणार आहे. तसेच पनवेल ते वाशी अप-डाऊन हार्बर मार्गावरही सकाळी 11.30 वा.पासून सायंकाळी 4 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर सकाळी 10.37 पासून दुपारी 3.06 वाजेपर्यंत कल्याणहून सुटणार्‍या अप जलद मार्गाच्या सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर चालविण्यात येतील आणि सर्व स्थानकांवर थांबतील. त्यानंतर ठाणे आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान आपल्या निर्धारित अप जलद मार्गावर चालविण्यात येतील. या सेवा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा स्थानकावर थांबतील. तसेच या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटे उशिरा शेवटच्या स्थानकांवर पोहचतील. तर सकाळी 11.06 वाजल्यापासून ते दुपारी 04.01 वाजेपर्यत पनवेलहून सीएसएमटीसाठी आणि सकाळी 10.03 ते दुपारी 3.16 वाजेपर्यत वाशीहून पनवेल, बेलापुर येथे जाणार्‍या सर्व उपनगरीय सेवा रद्द राहणार आहेत. या ब्लॉक काळात सीएसएमटी-वाशी खंडावर विषेश लोकल चालविण्यात येणार आहे. सकाळी 11.12 वा.पासून ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्यासाठी आणि सकाळी 11.14 ते दुपारी 3.29 वाजेपयर्र्ंत ठाण्याहून पनवेलसाठी सुटणार्‍या ट्रांसहार्बर मार्गाच्या सेवाही रद्द राहणार आहेत. सकाळी 11.45 वा.पासून दुपारी 2.45 वा.पर्यंत नेरूळहून खारकोपरसाठी सुटणार्‍या डाऊन आणि सकाळी 12.15 वा.पासून दुपारी 3.15 वा.पर्यंत खारकोपरहून नेरूळसाठी सुटणार्‍या अप सेवा रद्द राहतील. ब्लॉक काळात बेलापुर आणि खारकोपर दरम्यान सर्व सेवा निर्धारित वेळेप्रमाणे चालविण्यात येतील.

आसनगाव-कसारादरम्यान
ट्रॅफिक आणि पावर ब्लॉक
रविवार, 10 नोव्हेेंबर आणि रविवार 17 नोव्हेेंबरला मध्य रेल्वेच्या आसनगाव-कसारा स्थानकांदरम्यान ट्रॅफिक आणि पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 वा.पयर्र्ंत आसनगाव आणि कसारा दरम्यान अप-डाऊन मार्गावर 2 टन ब्रॉड फ्लैंज बीम ऑफ-लोडेड पोर्टलला हटविण्यासाठी ट्रॅफिक आणि पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

‘परे’वर जम्बोब्लॉक
रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणांच्या दुरुस्तीसाठी पश्‍चिम रेल्वे मार्गावर रविवार, 10 नोव्हेेंबर रोजी सांताक्रुझ-गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी 10.35 वा.पासून ते दुपारी 3.35 वा.पयर्र्ंत अप-डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक काळात अप-डाऊन जलद मार्गावरील लोकलना सांताक्रुझ-गोरेगांव स्थानकांदरम्यान अप-धीम्या मार्गावर चालविण्यात येतील.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
कोरोना मुंबई

ठाण्यात १५४ नवे रुग्ण, ८२ रुग्णांनी केली कोरोनावर मात

ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा  (coronavirus)आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज एका दिवसांत तब्बल १५४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ठाणे शहरांतील एकूण...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवलीत आज चौघांचा मृत्यू, ३८ नव्या रुग्णांची भर

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासांत ३८ नवीन कोरोना (corona) रुग्णांची भर पडली आहे तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना मुंबई

धारावी, माहिम, दादरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच!

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली आहे. मुंबईच्या धारावीत कोरोनाचा अक्षरश: कहर सुरू असून याठिकाणी दररोज नवे रुग्ण आढळत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

चिंता वाढतेय! राज्यात आज ६० मृत्यू, २ हजार ४३६ नवे रुग्ण

मुंबई – देशासह राज्यात कोरोनाचं (coronavirus)थैमान सुरुच आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या पार गेली आहे. आज राज्यात नव्या २ हजार 4३६ रुग्णांची भर पडली....
Read More
post-image
कोरोना देश

रेल्वे भवनातील अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण, दोन दिवस भवन राहणार बंद

नवी दिल्ली – रेल्वे भवनातील काही अधिकाऱ्यांना कोरोनाची(coronavirus) बाधा झाल्याने २६ आणि २७ मे दरम्यान रेल्वे भवन बंद राहणार आहे. या काळात रेल्वे भवनात...
Read More