कल्याण – कल्याण-विठ्ठलवाडी मार्गावर रेल्वे रूळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी ६.१५ च्या सुमारास रूळाला तडे गेल्याने कर्जत-खोपोलीकडे जाणाऱ्या तसेच मुंबईकडे येणाऱ्या वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे. रूळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. हा बिघाड दुरूस्त करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येत असली तरीही रेल्वे उशिराने धावत आहे. ऐन कामाच्या वेळी मध्य रेल्वे उशिराने असल्याने प्रवाशांचा चांगलाच खोळंबा होत आहे.
