मध्य आणि हार्बर मार्गावर आज ‘मेगाब्लॉक’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मध्य आणि हार्बर मार्गावर आज ‘मेगाब्लॉक’

मुंबई – मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ दुरुस्ती, ओव्हरहेड वायरची देखभाल करण्यासाठी आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर १८ मे आणि १९ मे रोजी रात्रकालीन जम्बोब्लॉक घेण्यात आल्याने आज मेगाब्लॉक नसेल.

मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते माटुंगा सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सीएसएमटी दिशेकडे जाणाºया जलद मार्गावरील लोकल सकाळी १०.२६ ते दुपारी २.४८ वाजेपर्यंत धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. दिवा ते परळ या स्थानकांदरम्यान या लोकल सर्व स्थानकांवर थांबतील. परळनंतर त्या जलद मार्गावर चालविण्यात येतील.सकाळी १०.०५ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत सीएसएमटीहून कल्याण दिशेकडे जाणाºया जलद मार्गावरील सर्व लोकल संबंधित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकावर थांबतील. गाडी क्रमांक ५०१०४ रत्नागिरी ते दादर पॅसेंजर दिवापर्यंत चालविण्यात येईल. तर, गाडी क्रमांक ५०१०३ दिवावरून चालविण्यात येईल. मेल, एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी दादर ते दिवादरम्यान विशेष लोकल चालविण्यात येईल. ती दादरहून दुपारी ३.४० वाजता सुटेल.

हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून चुनाभट्टी, वांद्रे दिशेकडे जाणाऱ्या सकाळी ११.४० ते ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत सर्व लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत चुनाभट्टी, वांद्रेहून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या सर्व लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी ११.३४ ते दुपारी ४.२३ वाजेपर्यंत सीएसएमटी, वडाळा रोडहून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी तसेच सकाळी ९.५६ ते दुपारी ४.१६ वाजेपर्यंत सीएसएमटीहून वांद्रे, गोरेगावसाठी एकही लोकल धावणार नाही.

नेरळ-माथेरान मार्गावर ब्लॉक सोमवार 20 मे 2019 पासून

सोमवार ते शुक्रवार सार्वजनिक सुट्ट्या सोडून सकाळी 09.45 वाजल्यापासून दुपारी 1.45 वाजेपर्यंत वेगवेगळ्या अभियांत्रिकी कामांसाठी नेरळ-माथेरान मार्गावर विशेष वाहतूक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्लॉकमुळे गाडी क्र मांक 52103 नेरळहून 8.50 वाजता सुटणारी तसेच 52102 माथेरानहून 9.20 वाजता सुटणारी ट्रेन रद्द करण्यात आली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More
post-image
देश

सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

मुंबई – आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २२ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर...
Read More
post-image
महाराष्ट्र

साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर दिब्रिटोंच्या निवड, विहिंपकडून विरोध

उस्मानाबाद – 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. याला विश्व हिंदू परिषदेने...
Read More