मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर देखभालीच्या दुरुस्तीसाठी रविवार 19 मे रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी 11.15 वाजल्यापासून ते दुपारी 3.15 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. तसेच हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

सकाळी 10.26 वाजल्यापासून दुपारी 02.48 वा.पर्यंत कल्याणहून सुटणारी अप जलद मार्गावरील सर्व लोकल दिवा-परेल स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. तसेच दिवा आणि परेल स्थानकांदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. त्यानंतर परेलहून अप जलद मार्गावर चालविण्यात येतील. सकाळी 10.05 वा.पासून ते दुपारी 3.22 वा.पर्यंत सीएसएमटीहून सुटणारी डाऊन जलद/सेमी जलद मार्गावरील लोकल आपल्या संबंधित थांब्याशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड तसेच दिवा स्थानकावर थांबतील. आपल्या शेवटच्या स्थानकावर 20 मिनिटे उशिरा पोहोचतील. तसेच सकाळी 11 वा.पासून ते सायंकाळी 6 वा.पर्यंत सीएसएमटीहून सुटणार्‍या आणि पोहोचणार्‍या धीम्या लोकल आपल्या शेवटच्या स्थानी 10 मिनिटे उशिरा पोहोचतील. 50104 रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडीला दिवा स्थानकावरच थांबविण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी/ बांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 वाजल्यापासून सायंकाळी 4.10 वा.पर्यंत तसेच चुनाभट्टी/बांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 वा.पासून ते दुपारी 3.40 वा.पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

नेरळ-माथेरान मार्गावर ब्लॉक सोमवार 20 मे 2019 पासून सोमवार ते शुक्रवार सार्वजनिक सुट्ट्या सोडून सकाळी 09.45 वाजल्यापासून दुपारी 1.45 वाजेपर्यंत वेगवेगळ्या अभियांत्रिकी कामांसाठी नेरळ-माथेरान मार्गावर विशेष वाहतूक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्लॉकमुळे गाडी क्र मांक 52103 नेरळहून 8.50 वाजता सुटणारी तसेच 52102 माथेरानहून 9.20 वाजता सुटणारी ट्रेन रद्द करण्यात आली आहे.

शनिवार-रविवार ‘परे’वर रात्रकालिन जम्बो ब्लॉक

रेल्वे सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी पश्‍चिम रेल्वेवर शनिवार 18 मे आणि रविवार 19 मे च्या मध्यरात्री जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. बोरिवली आणि भार्ईंदर स्थानकादरम्यान रात्री 11.30 वाजल्यापासून मध्यरात्री 3.30 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर तसेच रात्री 00.30 वाजल्यापासून ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर रात्रकालिन जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यानुसार पश्‍चिम रेल्वेवर रविवारी सकाळी कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे उद्या नाशिक शहरात जाणार

नाशिक – शिवसेना नेते आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही....
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सोज्वळ अभिनेत्री उमा भेंडे

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म ३१ मे १९४५ साली कोल्हापूर येथे झाला. सोज्वळ अभिनेत्री म्हणून उमा भेंडे यांनी मराठी रसिक मनावर...
Read More
post-image
देश

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता! ३६ हजाराच्या घरात जाणार

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोने महागण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सोन्याचा भाव सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या विचारात...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरच्या सातपाटी परिसरात यंदा पापलेटच्या उत्पादनात घट

पालघर – राज्यासह जगभरात निर्यात होणार्‍या पालघरच्या सातपाटी परिसरातील पापलेट या मत्स्याच्या प्रकारामध्ये यंदा प्रचंड घट झाली आहे. पापलेटचे उत्पादन गेल्या हंगामापेक्षा 190 टनांनी घटले...
Read More
post-image
देश

मनोहर पर्रिकरांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद

पणजी – गोव्यामधील मिरामार बीचवर गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी गोव्याच्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात...
Read More