मध्य अमेरिकेत वादळाचा फटका; १३३९ विमानांची उड्डाणे रद्द – eNavakal
विदेश

मध्य अमेरिकेत वादळाचा फटका; १३३९ विमानांची उड्डाणे रद्द

वॉश्गिंटन – अमेरिकेला बॉम्ब चक्रीवादळचा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. ताशी ११० किमी वेगाने वारे वाहत असून आज 1339 विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सरकारी कार्यालये तसेच शाळा, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोलोरॅडो, व्योमिंग, नेब्रास्का आणि नॉर्थ-साउथ डकोटामध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या बॉम्ब वादळात जोरदार बर्फवृष्टीदेखील सुरू आहे. कोलोरॅडोचे राज्यपाल जेयर्ड पुलिस यांनी चक्रीवादळची तीव्रता लक्षात घेऊन आपकाल घोषित केला आहे. लोकांना बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. न्यू-मॅक्सिको, विस्कॉन्सिन, मिनेसोटा, डलास टेक्सास, मिशिगन आणि आयोवामध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. 125 जण दुर्घटनेत बळी पडल्याची प्राथमिक माहिती डेनवर पोलीस विभागाने ट्विटरवर दिली आहे. रस्त्यावर बर्फाचा सडा पडला असून, जोरदार वारे वाहत आहे. कोलोरॅडोमध्ये एका सैनिकाचा वादळामुळे गाडीची टक्‍कर लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

नाशिकच्या मुथूट दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपीला सुरतमधून अटक

नाशिक – नाशिक पोलिसांनी मुथूट दरोडा आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपाला सुरतमधून अटक केली असून जितेंद्र बहादूर सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

‘त्या’ तीन मंत्र्यांना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई – ना. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांना मुंबई हायकोर्टाने तूर्तास दिलासा मिळाला असून त्यांच्या मंत्रिपदाला आव्हान देण्यार्‍या याचिकेवर तातडीने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

…तर मिशा ठेवणार नाही! उदयनराजेंचे आयोगाला आव्हान

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्यावेळी सदोष ईव्हीएम यंत्रांमुळे सातारा मतदारसंघात प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने माझ्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शरद कळसकरला 8 जुलैपर्यंत कोठडी

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कळसकरला 8...
Read More
post-image
News मुंबई

सरकारी कर्मचार्‍यांचा 27 जूनला ‘लक्षवेध’ दिन

मुंबई – पाच दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय 60 करावे आणि अन्य मागण्यांसाठी 27 जूनला सरकारी कर्मचारी लक्षवेध दिन पाळणार आहे आणि तरीही मागण्या मान्य...
Read More