मध्यावधी निवडणुकांसाठी तयार रहा उध्दव ठाकरेंकडून नेत्यांना आदेश – eNavakal
मुंबई राजकीय

मध्यावधी निवडणुकांसाठी तयार रहा उध्दव ठाकरेंकडून नेत्यांना आदेश

मुंबई- राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात. त्यासाठी तुम्ही तयार राहा, असे आदेश आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांना दिले. दरम्यान, यावेळी शिवसेनकडून उपस्थितांना महापालिका निवडणुकीतील जाहिरनाम्याचे परिपत्रकही वाटण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
शिवसेना सत्तेत कायम राहणार का? याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यातच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी एनडीएत प्रवेश केला असून त्यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य समावेशाबाबत शिवसेना नाराज आहे. त्यामुळे नारायण राणेंना सत्तेत सहभागी करून घेतल्यास शिवसेना काय भूमिका घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज दादर येथील शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मंत्री, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख यांची बैठक पार पडली. या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी राज्यात कधीही निवडणुका होऊ शकतात त्यासाठी तयार राहा. युती होईल किंवा नाही होणार, तुम्ही तयार राहा, असे आदेशच दिले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

अयोध्या यात्रेच्या तयारीची सुरुवात नाशिकमधुन – संजय राऊत

नाशिक – राम मंदिर हा श्रद्धेचा आणि भावनेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही या विषयात कोर्ट मानत नाही. कोणतच कोर्ट या विषयाचा निवाडा करू शकत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मंदिरांच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप नको – रजनीकांत

चेन्नई – केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांना अद्यापही प्रवेश मिळाला नाही. १७ ऑक्टोबरला मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. मात्र महिलांच्या प्रवेशाला मज्जाव करण्यात आला....
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दहशतवाद्यांच्या गडामध्ये भाजपाचा मोठा विजय

श्रीनगर – दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा गड मानल्या जाणार्‍या शोपिया, कुलगाम, पुलवामा आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये भाजपाने नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळविला आहे. 20 पैकी 4...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणी टंचाईवरून सत्ताधारी नगरसेवकांचा महापालिकेवर मोर्चा

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सत्ताधारी भाजप विरोधात विरोधक आक्रमक झाले असताना स्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेवर पाण्याच्या निषेधार्थ मोर्चा काढत...
Read More