मध्यरात्री ग्रामस्थ आणि दरोडेखोरांमध्ये धुमश्चक्री! एक दरोडेखोर ठार! 4 ग्रामस्थ जखमी – eNavakal
News महाराष्ट्र

मध्यरात्री ग्रामस्थ आणि दरोडेखोरांमध्ये धुमश्चक्री! एक दरोडेखोर ठार! 4 ग्रामस्थ जखमी

नाशिक – सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळक्याने एका कुटुंबियावर जोरदार हल्ला करत चौघांना जखमी केले.जखमींची आरडाओरड ऐकून इतर वस्तीवरील ग्रामस्थ त्यांच्या मदतीला येत त्यांनी दरोडेखोखांचा पाठलाग सुरू केला.दरम्यान दरोडेखोर आणि ग्रामस्थ यांच्यात जोरदार धुमश्चक्री उडाली. ग्रामस्थांच्या हाणामारीत एका दरोडेखोराचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे.
जखमी दरोडेखोर तसेच दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चौघांवर ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना मध्यरात्रीचांदवड तालुक्यातील खैसवाडी वस्तीवर घडली. या घटनेमुळे चांदवड तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खैसवाडी शिवारात डॉ. प्रकाश कबाडे यांची शेती आहे. गेल्या काही वर्षांपासून नवनाथ मोरे यांनी कबाडे यांची शेती बटाईने घेतली आहे.शेतातील घरात नवनाथ हा पत्नी नंदा, मुलगा समाधान यांच्यासह राहतो. घरात गरम होत असल्याने नवनाथ व समाधान ओट्यावर झोपलेले होते.मध्यरात्री आलेल्या दरोडेखोराच्या टोळक्याने बापलेकांना उठवून त्यांना चाकूचा धाक दाखवत घरात झोपलेल्यांना आवाज देण्यास भाग पाडले.घराचा दरवाजा ठोठावत नवनाथने आवाज देताच नंदाने दरवाजा उठडला.तेेहडयात दरोडेखोर घरात घुसले.
दरोडेखोरांनी हातातील काठी आणि चाकूने वार करत नवनाथ आणि समाधानला जखमी केले. मोरे कुटुबियांची आरडाओरड ऐकून काही अंतरावरील घरातील प्रकाश वाजदेव आणि संतोष आहिरे धावत आले.दरोडेखोरांनी त्यांनाही मारहाण करत जखमी केले. सर्वच जखमीनी मदतीसाठी मोठमोठ्याने आरडाओरड केली असता जवळच्या वस्तीवरील ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली.ग्रामस्थांच्या जथ्थाला पाहून दरोडेखोरांनी पळ काढळा.ग्रामस्थांनी दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला.या दरम्यान ग्रामस्थ व दरोडेखोर यांच्यात जोरदार धुमश्चक्री उडाली. संतापलेल्या ग्रामस्थाच्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे.अंधाराचा फायदा घेत तिघे दरोडेखोर पसार झाले आहे.आरोपी दरोडेखोरांची नावे देण्यास उशिरापर्यत पोलिस प्रशासन टाळाटाळ करत होते.पोलिसांच्या या भूमिकेचे गुढ उशिरापर्यत कायम होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीचा प्लास्टरचा भाग कोसळून कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

टायगर-दिशाचा ब्रेकअप! चाहत्यांमध्ये नाराजी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली कधीच उघडपणे दिली नाही. मात्र कधीच उघडपणे आपल्या रिलेशनशिपला नकारही दिला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी त्रालमध्ये चकमक

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात जंगलात ही चकमक सुरू असून दोन ते...
Read More
post-image
मुंबई शिक्षण

साने गुरुजी विद्यालयाचा प्राथमिक विभाग बंद

मुंबई – विद्यार्थ्यांच्या संर्वांगीण विकासाठी सतत धडपडणारी एक नामांकित संस्कारक्षम शाळा म्हणून ओळख असणाऱ्या दादर पश्चिम भागातील साने गुरुजी विद्यालयातील मराठी माध्यमाचा प्राथमिक विभाग...
Read More