मध्यप्रदेशातील चित्रकूट येथे भीषण अपघात – eNavakal
देश वाहतूक

मध्यप्रदेशातील चित्रकूट येथे भीषण अपघात

चित्रकूट – मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे मुरका गावामध्ये आज सकाळी साधारण साडे पाचच्या सुमारास सामने भरलेला ट्रक व एका चार चाकी खाजगी वाहनामध्ये भीषण अपघात झाला आहे.

अपघातामध्ये चार चाकी वाहनातील पाच व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. सीएचसी शंकरगड रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. झांसी मधील मऊराणी भागातून नऊ लोक आपल्या खासगी वाहनातून अलाहाबादच्या  दिशेने जात होते. चित्रकूट मधील मुरका गावाच्या दिशेने जाणारा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. या दोन वाहनांमध्ये टक्कर होऊन भीषण अपघात झाला. वाहनातील लोकांची किंकाळ्या ऐकून गावकऱ्यांनी येऊन पीडितांना बाहेर काढले. अपघातामध्ये दोन विवाहित जोडपे व एका तरुणाचा मृत्यु झाला आहे. 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा...
Read More
post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

राज्यातील महापूर प्रशासकीय गलथानामुळे आरोप करणारी जनहित याचिका हायकोर्टात

मुंबई – कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही प्रशासकीय गलथानपणा आणि धरणातील पाणी सोडण्यासंदर्भात केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशांचे बेदरकार उल्लंघन झाल्याचा आरोप करून कर्नाटक...
Read More