मदर तेरेसा यांचे भारतरत्न काढून घ्या – आरएसएस – eNavakal
News आघाडीच्या बातम्या देश

मदर तेरेसा यांचे भारतरत्न काढून घ्या – आरएसएस

नवी दिल्ली- मदर तेरेसा यांच्या अशासकीय संस्थेवर लहान बाळाच्या विक्रीचा आरोप झाला असून जर हा आरोप खरा असेल मदर तेरेसा यांचे भारतरत्न काढून घ्यावे, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख राजीव तुली यांनी केली आहे. भारतरत्न या पुरस्काराला डाग लागलेला भारतीयांना आवडणार नाही असे तुली यांनी सांगितले.

1980 मध्ये मदर तेरेसा यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते. याआधीही मदर तेरेसा यांच्याविरोधात आरोप झाले होते आणि आताही आरोप होत आहेत. जर का हे आरोप सिद्ध झाले तर मदर तेरेसा यांच्या भारतरत्न पुरस्काराचा पुन्हा विचार करावा लागेल असे तुली यांनी सांगितले. ज्या मदर तेरेसा यांना व्हॅटिकनने गेल्या वर्षी संत पद बहाल केले त्यांनी कधीच लोकांच्या भल्यासाठी काम केले नाही तर धर्मांतर हा त्यांचा मुख्य हेतू होता, असा आरोपही तुली यांनी केला आहे. दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी यांनीही तुली यांच्या म्हणण्याला पाठिंबा दिला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News क्रीडा देश

विश्वचषक स्पर्धेत भारताला चांगला खेळ करावा लागेल-राहुल द्रविड

मुंबई – आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद मिळवायचे असेल तर भारताला चांगला खेळ करावाच लागेल, असे भारताचा माजी कर्णधार आणि जुनिअर भारतीय संघाचे मुख्य...
Read More
post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू

दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मादी आणि एका नर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईच्या कळंब समुद्रात 5 जणांना जलसमाधी

वसई – वसई तालुक्याच्या कळंब समुद्रकिनारीवर होळी- रंगपंचमी साजरी करण्यासाठी आलेल्या पाच जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली. एकाचा मृतदेह...
Read More