मथुरेतील जगप्रसिद्ध बरसाना होळी; परदेशी नागरिकांची उपस्थिती – eNavakal
देश

मथुरेतील जगप्रसिद्ध बरसाना होळी; परदेशी नागरिकांची उपस्थिती

मथुरा – कृष्ण कन्हैयाच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या मथुरा जिल्ह्यात होळी सणाला उत्साहात सुरूवात झाली आहे. काल नंदगावमध्ये लड्डू होळी खेळल्यानंतर आज मथुरेतील बरसानामध्ये जगप्रसिद्ध लाठीमार होळी उत्साहात खेळण्यात आली. बरसाना हे कृष्णाची सखी राधाचे गाव आहे. या होळीची अनोखी प्रथा पाहण्यासाठी देशाप्रमाणेच परदेशातील पर्यटकांनीदेखील हजेरी लावली होती. संपूर्ण मथुरा जिल्हा परंपरेनुसार होळी सण साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. बरसाना आणि नंदगावच्या लाठीमार होळीची परंपरा खूपच वेगळी आहे. नंदगावचे युवक बरसानाच्या युवतींबरोबर होळी खेळतात. त्यावेळी युवती युवकांना लाठीने मारतात. ही कृष्णकालिन परंपरा आहे.

परंपरेनुसार काल कृष्णाची सखी राधेच्या बरसाना गावातील युवतींनी ढोलताशांच्या गजरात नंदगावात जाऊन लाठीमार होळीचे आमंत्रण दिले. त्यावेळी लाडू वाटप करून सुमारे 3 तास युवक युवतींनी नृत्याची मजा लुटली. त्याला लड्डूमार होळी म्हटले जाते. आज लाठीमार होळीसाठी नंदगावहून बरसानाला युवकांनी मोठ्याप्रमाणात हजेरी लावली. यावेळी होळीचे रंग खेळताना युवती युवकांना काठीने मारुन चांगला समाचार घेत मौज मस्ती करत गुलाल उडवून होळीचे रंग उधळले. हा उत्सव पाहण्यासाठी देशभरातून मोठ्याप्रमाणात गर्दी होते. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने 12 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली असून 24 ठिकाणी बॅरिकेस्ट लावले आहेत. जास्त गर्दीच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून ड्रोनच्या माध्यमातून सुरक्षेची उपाय योजना करण्यात आली. आणखी काही दिवस मथुरेत होळीचा माहोल पहावयास मिळणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश संपादकीय

(संपादकीय) लोकसभा निवडणुकीचे भवितव्य ‘ईव्हीएम मशीन’च्या हाती

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागत असताना देशभरातील तब्बल 21 विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिनविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली त्याची कारणे काहीही असतील. तरीसुध्दा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बदलापूरजवळ बिबट्या मृतावस्थेत आढळला

बदलापूर – बदलापूरपासून आठ किलोमीटर लांब असलेल्या ढवळे गावाच्या मागील वनविभागाच्या हद्दीत एक बिबट्या झुडपात मृतावस्थेत आढळल्याचा प्रकार आज समोर आला आहे. या बिबट्याचा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

चार्‍याच्या भाववाढीमुळे पशुपालक शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले

येवला – बळीराजाचे आयुष्यच शेतीशी निगडित असल्याने पावसाच्या कृपेवर आर्थिक गणित अवलंबून असते दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात पिण्याचा पाण्यासोबतच चार्‍याचा प्रश्नही गंभीर झाला आहे हिरव्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात कर्नाटक हापुसचे आक्रमण! स्थानिक बागायतदारांचे नुकसान

मुरुड-जंजिरा – कोकणातील हापुस आंबा आणि त्याची चव प्रसिद्ध आहे. त्या नावाखाली रायगड जिल्ह्यात काही मंडळींनी कर्नाटक हापुस आंबे टनावारी आणले आहेत. यामध्ये रायगडातील...
Read More
post-image
News मुंबई

कांदिवलीत गाडी पार्किंगचा रॅम्प कोसळल्याने 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई- गाडी पार्किंगचा रॅम्प अचानक कोसळल्याने त्याखाली चिरडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार आज कांदिवली परिसरात घडला असून त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली...
Read More