मतमोजणी केंद्रावर काँग्रेस नेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

मतमोजणी केंद्रावर काँग्रेस नेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

भोपाळ – लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच भाजपने जोरदार मुसंडी मारली. भाजपने 2014 पेक्षाही मोठ्या फरकाने विरोधकांना पाणी पाजल्याचे कल हाती येऊ लागले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या दरम्यान मध्य प्रदेशातील काँग्रेसचे नेते रतन सिंग यांचा मतमोजणी केंद्रावर मतमोजणीच्या वेळीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

रतन सिंग हे मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात काँग्रेसचे अध्यक्ष होते. मतमोजणीच्या वेळी निवडणुकांचे काय कल आहेत? याबाबत माहिती घेत असताना रतन सिंग यांच्या छातीत दुखू लागले. त्यांनी याबाबत तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनाही सांगितले. पण तेवढ्यातच ते कोसळले. काँग्रेस या जागेवर लढत असून तेथे काँग्रेस खूपच पिछाडीवर आहे. येथे काँग्रेसकडून दिग्विजय सिंग हे रिंगणात आहेत, तर भाजपने साध्वी प्रज्ञा सिंग यांना रिंगणात उतरवले आहे. मतमोजणीचे कल पाहता दुपारी 2 वाजेपर्यंत साध्वी प्रज्ञा सिंग या दिग्विजय सिंग यांच्यापेक्षा समाधाकारक आघाडीवर होत्या.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More