मणिपूरमध्ये नागा पीपल्स फ्रंटने भाजपा सरकारचा पाठिंबा काढला – eNavakal
News देश

मणिपूरमध्ये नागा पीपल्स फ्रंटने भाजपा सरकारचा पाठिंबा काढला

इंफाळ- लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस आता अगदी जवळ आला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील काँग्रेसच्या गोटात धडधड वाढली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वीच भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. पूर्वेत्तर राज्यातील मणिपूरमध्ये भाजपासोबत आघाडीत असलेल्या नागा पीपल्स फ्रंटने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आज सायंकाळी नागा पीपल्स फ्रंटने याची घोषणा केली.

कोहिमा येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयात आज नागा पीपल्स फ्रंटच्या नेत्यांची बैठक घेण्यात आली. खूप वेळ चाललेल्या या बैठकीत सरकारचा पाठिंबा काढत असल्याचा निर्णय घेण्यात आला. नागा पीपल्स पक्षाच्या सूचना तसेच कल्पनांचा भाजप विचार करत नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाचे प्रवक्ते अचुम्बेमोकीकॉन
यांनी सांगितले.  दरम्यान, 60 सदस्य असणार्‍या मणिपूर विधानसभेत भाजपचे 31 आमदार आहेत. भाजप सरकारला आणखी दोन आमदारांचा पाठिंबा आहे. पाठिंबा काढणार्‍या नागा पीपल्स फ्रंट पक्षाचे फक्त चार आमदार आहेत. सध्या भाजपकडे बहुमत असल्याने सरकारला धोका नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
लेख

वत्तविहार : मराठीचा न्यूनगंड कायम

महाराष्ट्र सरकारला आपल्याच मातृभाषेचे महत्त्व समजत नसेल तर या सरकारच्या बुध्दीची जेवढी कीव करावी तेवढी थोडीच आहे. विशेषतः शिक्षण विभागाने मराठीबाबत जो काही खेळखंडोबा...
Read More
post-image
देश

भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार! सुरुवात ‘आयआरसीटीसी’पासून

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या पाच ‘रेल्वे सेवांपैकी’ एक आहे. मोदी सरकारने भारतीय रेल्वेचे आता खाजगीकरण करायचे ठरविले आहे. कमी गर्दीच्या आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार! मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई – नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असून या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, मुरुडसह 40 गावांमधील ग्रामस्थांचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सावजी हॉटेलना मिळणार दारूचा परवाना

नागपूर – नागपूर येथील प्रसिद्ध सावजी हॉटेलांमध्ये व धाब्यांवर दारू विकण्यास उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे आता नागपुरात कायदेशीरपणे मद्यविक्री केली जाईल....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पवईत हॉटेलला आग; अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी

मुंबई – पवईतील हिरानंदानी परिसरात हॉटेलला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. देव कोरडकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून...
Read More