मडगाव-हप्पा रेल्वेतून दीड लाखांची दारू जप्त – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

मडगाव-हप्पा रेल्वेतून दीड लाखांची दारू जप्त

रत्नागिरी – निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर गुजरातला रेल्वेमधून चोरट्या पद्धतीने नेेली जात असलेली गोवा बनावटीची दारू रेल्वे पोलिसांनी जप्त केली आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकात मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. गोवा बनावटीची ही दारु गुजरात येथे नेली जात होती. कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव-हप्पा या ट्रेन मधून ही दारु नेण्यात येत होती.

मडगाव-हप्पा ट्रेनमधून गोवा बनावटीची दारू गुजरातला नेली जात असल्याची गुप्त माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. बोगीच्या बाथरुमच्या बाहेर असणा-या प्लायमध्ये ही दारु कुणालाही संशय येणार नाही अशा प्रकारे ही दारु ठेवण्यात आली होती. मात्र रेल्वे पोलीसांनी हा डाव उधळून लावला. रत्नागिरी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे पोलीसांनी ही कारवाई केलीय. जवळपास दिड लाख रुपये किमतीची ही दारु आहे. मुंबई गोवा महामार्गावरुन अनेक वेळा गोवा बनावटीची दारु अनेकवेळा मुंबईसह राज्यात काही ठिकाणी तस्करी केली जाते. आता पुन्हा कोकण रेल्वे मार्गाचा वापर दारु तस्करीसाठी केला जातोय. गुजरात मध्ये ही दारु पाठवून त्याचे पाचपट पैसे वसुल केले जातात. मात्र रेल्वे पोलीसांनी केलेल्या या कारवाईमुळे नक्की याला काही प्रमाणात का होईना आळा बसेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

खंबाटकी घाटालगत ट्रक-बोलेरोच्या अपघातात तीन ठार! दोन गंभीर

सातारा – सातार्‍याच्या खंबाटकी घाटालगत असलेल्या हॉटेल पार्क इन सहारा समोर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास उभ्या असलेल्या ट्रकला सातारा बाजूकडून येणार्‍या बोलेरो जीपने पाठीमागून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

प्रज्ञा सिंहला पक्षातून काढून टाका, नितीशकुमार यांची भाजपाकडे मागणी

भोपाल – हिंदी भाषिक पट्ट्यातील भाजपाचा एकमेव मित्रपक्ष असलेल्या जनता दल संयुक्तचे भाजपाशी असलेले संबंध बिनसले आहेत. जदयूचे सर्वेसर्वा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

(Live) #Elections2019 दुपारी १ वाजेपर्यंत ३९.८५ टक्के मतदान

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज ५९ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. आज 8 राज्यांमध्ये 59 जागांवर मतदान होणार आहे. त्यानंतर 23...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गडचिरोली बंद, नक्षलवाद्यांनी वखारीतील ट्रक पेटवला

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी अतिदुर्गम भागात मोठ्या प्रमाणात लाल रंगाचे बॅनर लावून आज ‘गडचिरोली जिल्हा बंद’चे आवाहन केले आहे. या बंदसाठी नक्षलवाद्यांनी एटापल्ली ते आलापल्ली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

ब्रिटनमध्ये नवीन शस्त्र कायदा मंजूर, शिखांना कृपाण बाळगण्याची परवानगी

लंडन – शस्त्रास्त्रांबाबत ब्रिटनच्या सरकारने नवीन कायदा मंजूर केला असून यात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात शिख बांधवांना पारंपारिक कृपाण जवळ बाळगण्याची परवानगी देण्यात आली...
Read More