मक्का बॉम्बस्फोट प्रकरण : माजी गृह मंत्री शिवराज पाटील – चाकूरकर यांचे सवाल – eNavakal
News देश

मक्का बॉम्बस्फोट प्रकरण : माजी गृह मंत्री शिवराज पाटील – चाकूरकर यांचे सवाल

नवी दिल्ली – हैदराबादमधील मक्का मस्जिद स्फोट प्रकरणी पुराव्याअभावी आरोपी स्वामी असीमानंदसह सर्व पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानंतर माजी गृह मंत्री शिवराज पाटील – चाकूरकर यांनी असीमानंद प्रकरणी ५० पेक्षा जास्त साक्षीदार का पलटले?, त्यांच्यावर दबाव आहे का ?,  राहुल गांधी यांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही, महात्मा गांधी यांची हत्या झाली तेव्हा कोणी माफी मागितली का?, असे अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

18  मे २००७ साली मक्का मस्जिदमध्ये नमाजाच्यावेळी शक्तीशाली स्फोटाची घटना घडली होती. या शक्तीशाली बॉम्बस्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला होता. तर ५८ जण गंभीर जखमी झाले होते. या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून आज निकाल देण्यात आला आहे. एएनआयला पुरावे सादर करण्यास अपयश आल्याने सर्व आरोपींची मुक्तता करण्यात आली आहे. एनआयए विशेष कोर्टाने आरोपींची सुटका केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पालघरमध्ये 5 बाईक अ‍ॅम्ब्युलन्स दाखल

वाडा- जिल्ह्यातील ज्या अतिदुर्गम भागात मोठी अ‍ॅम्ब्युलन्स जात नाही त्या ठिकाणच्या रुग्णांना आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील 5 आरोग्य केंद्रांना बाईक अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात आल्या आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

ग्रामीण भागातील चिंबोरी, मुठ्यांना शहरी भागात वाढली मागणी

विक्रमगड- पावसाळा सुरू झाला की सार्‍यांनाच वेध लागतात ते म्हणजे रानभाज्यांसोबत काळ्याभोर चिंबोर्‍या आणि खेकड्यांचे. खवय्यांसाठी मेजवानी ठरणार्‍या चिंबोर्‍या आणि खेकडे विक्रमगड बाजारात तसेच...
Read More
post-image
News मुंबई

बेस्टमध्ये नवीन 500 कंत्राटी कामगारांची भरती

मुंबई,-बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागात बेस्टच्या आर्थिक तोट्याचे कारण पुढे करत प्रशासन आणि कमिटीने खासगी कंत्राटदाराकडून 500 नवीन कंत्राटी कामगार भरती केले आहेत. त्यामुळे गेले...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पलुच्या धबधब्यावर 31 जुलैपर्यंत जाण्यास बंदी

विक्रमगड- जूनच्या शेवटच्या आठवडयात विक्रमगड व परिसरात दमदार असा पाऊस झाल्याने नदी, नाले, ओव्हळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. शेतामध्ये पाणी साठलेले आहे व...
Read More
post-image
News महाराष्ट्र

म्हारळ हद्दीतील डम्पिंग ग्राऊंड ‘ओव्हर फ्लो’

उल्हासनगर- कॅम्प नंबर 1 परिसरात म्हारळच्या हद्दीत असलेले डम्पिंग ग्राऊंड ओव्हर फ्लो झाल्याने उल्हासनगर पालिकेने कॅम्प नंबर 5 च्या भागात दुसरे डम्पिंग ग्राऊंड तयार...
Read More