मकर संक्रातीला तिळाची चणचण, राज्यात तिळाचे उत्पादन निम्यावर – eNavakal
News महाराष्ट्र

मकर संक्रातीला तिळाची चणचण, राज्यात तिळाचे उत्पादन निम्यावर

बुलडाणा – मकर संक्रात निम्मित राज्यात खरीप हंगामात तिळ पिकाचे सरासरी क्षेत्र ३८ हजार २०२ हेक्टर असून प्रत्यक्ष १७ हजार १२३ हेक्टर क्षेत्रावरच तिळाचे उत्पादन घेण्यात आले आहे. ५५ टक्के क्षेत्रावरील तिळ कमी झाल्याने या मकर संक्रातीला तिळाची चणचण जाणवत आहे. मकर संक्रात आली की तिळाची उलाढाल वाढते मात्र राज्यातील तिळ पिकाचे क्षेत्र सरासरी क्षेत्रापेक्षा निम्याने घटल्याचे दिसून येत आहे.
मकर संक्रातीला ‘तिळ गुळ’ बनविण्यासाठी तिळाचे महत्व जास्त असते. मकर संक्रातीलाच तिळाचा सण म्हणून ओळखले जाते. तिळाचे महत्व असलेल्या मकर संक्रातीच्या १५ दिवस अगोदरपासूनच राज्यभर तिळाच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल सुरू होते. खरीप हंगामात उत्पादन घेतलेला तिळ मकर संक्रातीच्या मुहूर्तावर वापरल्या जातो. महाराष्ट्रात तिळाचे सरासरी क्षेत्र ३८ हजार २०२ हेक्टर आहे. गेल्या चार वर्षापूर्वी संपूर्ण क्षेत्रावर तिळाची पेरणी करून १०० टक्के उत्पादन घेतले जात होते. मात्र, आता राज्यात तिळाचे क्षेत्र निम्याने घटल्याचे चित्र दिसून येत आहे. ३८ हजार २०२ हेक्टर क्षेत्रापैकी २०१७ मध्ये केवळ १७ हजार १२३ हेक्टर क्षेत्रावरच तिळाचे उत्पादन घेण्यात आले आहे. तर २०१६ मध्ये सुद्धा तिळाचे क्षेत्र कमीच म्हणजे २१ हजार १९४ हेक्टर क्षेत्रावरच राहिले. राज्यात खरीप हंगामातील तिळाचे क्षेत्र ५५ टक्क्याने घसरल्याने मकर संक्रातीसारख्या सणाच्या मुहूर्तावर तिळाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे तिळाचे भावही वाढले आहेत.
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात तिळाचे उत्पादन कमी झाले आहे. अमरावती विभागात एकूण ४ हजार ४२१ हेक्टर क्षेत्र तिळ पिकाखाली असून त्यापैकी केवळ २ हजार ६७३ हेक्टर क्षेत्रावरच तिळाचे उत्पादन घेण्यात आले. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात १ हजार ३५० हेक्टर, अकोला जिल्ह्यात ५५, वाशिम जिल्ह्यात ५२, अमरावती जिल्ह्यात १२ आणि यवतमाळ जिल्ह्यात ६७ हेक्टरवर खरीप हंगामात तिळ उत्पादन घेण्यात आले आहे. तिळाच्या भावातही सध्या बाजार समित्यानुसार तफावत दिसून येते. बुलडाणा जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या खामगाव येथे तिळाला ५ हजार ३०० ते ८ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. तर नांदुरा येथील बाजार समितीमध्ये ६ हजार ते ७ हजार २०० रुपये आणि शेगाव येथे ६ हजार ५०० ते ७ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये ५ हजार ५०० ते ८ हजार २५० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मोदींच्या आवाहनाला सोलापुरात गालबोट, विमानतळ परिसरात आग

सोलापूर – दिवा पेटवण्याचे आवाहन करण्यात आले असताना काही अतिउत्साही लोकांनी फटाके फोडल्याने मोठी आग सोलापुरात लागली आहे. सोलापूर विमानतळ परिसरात ही आग लागली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

फटाके फोडून परिस्थितीचे गांभीर्य घालवले? सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकांनी दारासमोर दिव्यांची उजळण केली. मात्र काही अतिउत्साही लोकांना परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे समोर आले...
Read More
post-image
देश

कोरोनाविरोधात लढण्यासाठी हरभजन सिंगचाही पुढाकार

नवी मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अनेकजण उपाशी झोपत आहेत. हातात काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना पोटाची खळगी भरून काढण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे....
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ७४८, मुंबई डेंजर झोनमध्ये?

मुंबई – आज राज्यात दिवसभरात ११३ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७४८ झाली आहे. तर, आतापर्यंत ५६ जणांनी कोरोनापासून स्वत:ची सुखरूप...
Read More