मंत्री अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय  – eNavakal
न्यायालय महाराष्ट्र राजकीय

मंत्री अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय 

औरंगाबाद :  शिवसेनेचे जालन्यातील आमदार आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यांनी निवडणूक अर्ज वेळेत न भरल्याने त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या कैलाश गोरंट्याल यांनी  याचिका दाखल केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती नलावडे यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे आमदार पद अपात्र घोषित केले असून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी खोतकर यांनी वेळ निघून गेल्यानंतर स्थानिक उपविभागीय अधिका-यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे ते निवडणूक लढविण्यास पात्र नव्हते असे याचिकेत म्हटले होते.

या याचिकेवर आज औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिला.  २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये खोतकर २९६ मतांनी विजयी झाले होते. यावर न्यायालयाने खोतकरांना ४ आठवड्यांची मुदत दिली असून या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले.

खोतकरांची आमदारकी रद्द झाल्यावर आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी प्रतिक्रिया देताना, न्यायालयाने वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी स्वतःहून राजीनामा देणे, ही खोतकरांची नैतिक जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
ट्रेंडिंग देश

आंतरराष्ट्रीय चहा दिन : सुर्रर्र के पियो!

‘सुर्रर्र के पियो’! हे वाक्य ऐकल्यानंतर अर्थात सर्वात प्रथम डोळ्यासमोर येतो तो गरमागरम चहा.  अनेकांना सकाळी उठल्यावर चहा  घेतल्याशिवाय कामाची तरतरी येत नाही. हल्ली...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघर आजही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले

पालघर – आज सलग तिसऱ्या दिवशी पालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात आज पहाटे 5 वाजून २2 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची...
Read More
post-image
देश

१३ दिवसांच्या उपोषणाने स्वाती मालीवालची प्रकृती बिघडली

नवी दिल्ली – बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला अटक केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या १३ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

उद्धव ठाकरेंचे सर त्यांच्याविषयी सांगतात…

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तम छायाचित्रकार आहेत, ही बाब कमी जणांना माहित आहे. मात्र त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विराटची टीम इंडिया आज वेस्ट इंडीजला भिडणार

चेन्नई – टी-२० मालिकेपाठोपाठ आजपासून भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होत आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांच्यापाठोपाठ आता...
Read More