मंत्रीपुत्राच्या बैठकीचे घोडे प्रशासनाच्या मानगुटीवर  – eNavakal
News महाराष्ट्र

मंत्रीपुत्राच्या बैठकीचे घोडे प्रशासनाच्या मानगुटीवर 

परभणी– राज्याच्या एका मंत्रीपुत्राने घेतलेल्या बैठकीचे वादळ शमण्याचेे मात्र नाव घेेेत  नाही. जिल्हा अधिकारी देखील या प्रश्नावर गांगरून गेल्याचे दिसून येत आहे. या बैठकीत मंंत्रीपुुुुत्रला कसा प्रवेश दिला गेला यावरही मंंथनाच्या फेे-या सुुुरू आहेत.  पत्रकारांच्या प्रश्नावर काय उत्तर द्यावे. असा पेच अधिकाऱ्यापुढे निर्माण झाल्याचा विचित्र प्रसंंग पहायला मिळत आहे.

मुख्यमंत्रीच्या दौऱ्याच्या वेळी झालेले हे वादळ. एका मंत्री पुत्राच्या बैठकीचे वादळ अद्यापही शमण्याचे नाव घेत नाही. राज्याचे मंत्री सुपुत्राने जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही शासकीय आदेश दिल्याचेही आरोप केले जात आहेत. परभणी शिवसेना खासदार संजय जाधव यांनी या बैठकीवर आक्रमक भूमिका घेतली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकर कसे घेतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. या बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी वेळीच विरोध का केला नाही. असा सवालही यावेळी उपस्थित झाला. सहाजिकच या प्रश्नाने मोठी अडचण निर्माण केली.

दरम्यानच्या काळात मंत्रीपुत्राने आपण ही बैठक घेतली नसल्याचा खुलासा केला होता. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही अधिकाऱ्यांना आपण सूचना केल्या होत्या असा खुलासा त्यांनी केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात एका पत्रकार परिषदेत या प्रश्नाला वाचा फुटली. पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली . मंत्रीपूत्र बैठक कशी घेतात, का घेतात कशाच्या आधारावर, साहजिकच सर्व प्रश्न विचारले. अधिकारी देखील या प्रश्नावर गडबडले. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर  म्हणाले या बैठकीस मी नव्हतो. असे सांगून त्यांनी वेळ मात्र निभावली, या प्रश्नासाठी पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना विविध सवाल केले, परंतु प्रशासनच अडचणीत आले.  एवढे मात्र हि घटना सांगून जाते. आणि त्यासाठी देण्यात येणारे खुलासेच अडचणीत भर घालात.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More