मंत्रालयातील योगदिनाला ठेंगा दाखवल्याने अधिकार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा – eNavakal
News मंत्रालय मुंबई

मंत्रालयातील योगदिनाला ठेंगा दाखवल्याने अधिकार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा

मुंबई – आज सगळीकडे योगदिन साजरा झाला असताना राज्याच्या प्रशासनाचे मुख्यालय समजल्या जाणार्‍या मंत्रालयात योगदिनाचा इव्हेंट मात्र सपशेल फ्लॉप ठरला. अधिकार्‍यांच्या या योगावरील अनास्थेची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेल्या सर्व अधिकार्‍यांना आज सामान्य प्रशासन विभागाने चक्क ‘कारणे दाखवा’ नोटिसा काढल्याचे समजते. यामुळे मंत्रालयातील अधिकार्‍यांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आज 21 जूनला सर्वत्र जागतिक योगदिन साजरा झाला. राज्य सरकारकडूनही हा योगदिन साजरा करण्याचे मोठे नियोजन करण्यात आले होते. हा इव्हेंट उत्तम पद्धतीने साजरा करण्यासाठी आवश्यक सूचना सरकारी पातळीवरून व भाजपा पक्षाकडूनही संबंधितांना देण्यात आल्या होत्या. मंत्रालयातही सर्व म्हणजे 700 अधिकार्‍यांना आज सकाळच्या योगदिनाच्या आयोजनाबाबत कळवण्यात आले होते. आज सकाळी सात वाजता मंत्रालयात योगदिनाचा हा कार्यक्रम पार पडला. मात्र यावेळी शंभरही अधिकारी उपस्थित नव्हते. मंत्रालयातील त्रिमूर्तीचे पटांगण अक्षरशः अर्धे रिकामे होते. यावेळी योगासनांनंतर अधिकारी वर्गासाठी चहापान आणि अल्पोपहाराची व्यवस्थाही करण्यात आली होती. पण निम्मेही अधिकारी उपस्थित राहिले नसल्याने अल्पोपहारही वाया गेल्याचे समजते. किमान चारशे अधिकारी तरी योगासाठी येतील, असे नियोजन करून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. कालपासून त्रिमूर्ती पटांगणात महागडे मॅट घालून व विविध फलक लावून या योगदिनाची तयारी करण्यात आली होती. पण अधिकार्‍यांच्या एवढ्या अनास्थेमुळे या इव्हेंटचा पूर्ण फज्जा उडाल्याचे समजते. सगळीकडे योग सादरीकरणाच्या चांगल्या बातम्या येत असताना मंत्रालयात असा प्रकार घडल्याने आज याठिकाणी या फसगतीचीच चर्चा होती. त्यात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकाराची गंभीर दखल घेत या अधिकार्‍यांना धडा शिकवण्याचा निर्धार केल्याने अधिकारी, कर्मचारीवर्गात एकच खळबळ उडाली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

सराफांच्या भिशीवर बंदी सरकारने अध्यादेश काढला

नवी दिल्ली- दाग-दागिने विकणार्‍या सराफांच्या भिशीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तसा अध्यादेशच आज सरकारने काढला. या अध्यादेशान्वये सराफ चालवत असलेल्या अल्पबचत योजनेवर बंदी...
Read More
post-image
News मुंबई

शक्ती मिल बलात्कार प्रकरण! हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यात फाशी नाही, तर बलात्कारात का?

मुंबई- एखाद्याची हत्या करणे अथवा शरीराचा एखादा भाग धडापासुन वेगळा करणे अशा अमानवी स्वरूपाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षेची तरतूद नाही . त्या मुळे हत्ये पेक्षा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईत बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प

वसई – बीएसएनएलच्या इंटरनेटचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे वसईतील दस्त नोंदणी रखडत चालली असून त्याचा फटका मात्र दररोज नोंदणी कार्यालये व त्याच्या लाखो...
Read More
post-image
News मुंबई

पालिकेचा केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ पुरस्काराने सन्मान

मुंबई – पालिकेद्वारे नागरिकांना देण्यात येणार्‍या विविध सेवा सुविधा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, विविध परवानग्या, दाखले, अनुज्ञप्ती पत्रे यासारख्या सेवा सुविधा माहिती...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पालिकेच्या रुग्णालयातील एक्स-रे मशीन कोमात

वसई- वसई-विरार महापालिकेच्या नालासोपार्‍यातील रुग्णालयाची एक्स-रे मशीन महिनाभरापासून नादुरुस्त असून आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे गोरगरीब रुग्णांना हजारो रुपयांचा भुर्दंड हकनाक सोसावा लागत आहे. नालासोपारा पुर्वेकडील...
Read More