मंतरलेल्या पिस्तुलाने सगळे खून केले गेले! – पृथ्वीराज चव्हाण – eNavakal
News आघाडीच्या बातम्या राजकीय

मंतरलेल्या पिस्तुलाने सगळे खून केले गेले! – पृथ्वीराज चव्हाण

नागपूर – महाराष्ट्र आणि कर्नाटकात एका विशिष्ट विचारधारेवर प्रहार करणाऱ्या व्यक्तींची मंतरलेल्या पिस्तुलाच्या सहाय्याने हत्या केली गेली, असा गौप्यस्फोट आज माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केला. विरोधी पक्षाच्या 293च्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी ही माहिती सभागृहात दिली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर भाष्य करताना भीमा-कोरेगावची दंगल ही पूर्वनियोजित असल्याचे म्हटले. या दंगलीला जबाबदार असलेल्या व्यक्तींना खऱ्या अर्थाने अटक होणे गरजेचे होते. मात्र, दुर्दैवाने राज्यात त्या व्यक्तींना राजाश्रय दिला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. एका विशिष्ट कट्टरवादी विचारांनी प्रेरित काही संघटना राज्यात आणि देशात कार्यरत आहेत. राज्यासह देशभरात सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या गेल्या चार वर्षांत हत्या करण्यात आल्या. ती हत्या एका विचारांनी भारावलेल्या लोकांनी आणि मंतरलेल्या पिस्तुलाच्या सहाय्याने करण्यात आल्याचे आता तपासात उघड होत आहे. या चौघांच्याही शरीरावर झाडण्यात आलेल्या गोळ्या एकाच पद्धतीच्या असल्याची माहिती तपासात पुढे येत असल्याचे चव्हाण यांनी सभागृहात सांगितले.
कर्मठ विचारांच्या सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी आघाडी सरकारच्या काळात केली गेली होती. त्यावर अजूनही निर्णय प्रलंबित असून त्या संस्थेवर आता बंदी घालण्यात यावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केली. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी चव्हाण यांच्या भाषणावर हरकत घेत तत्कालीन यूपीए सरकारनेच सनातन संस्थेच्या बंदीचा प्रस्ताव फेटाळला असल्याचे सांगितले. यावर चव्हाण यांनी हा प्रस्ताव अद्यापही फेटाळण्यात आला नसल्याचे सांगितल्याने दोघांमध्ये वादावादी झाली. यावेळी भातखळकरांच्या बाजूने भाजपा आमदार व दुसरीकडे काँग्रेस आमदारांनी गदारोळ घालत वेलमध्ये येण्याचा प्रयत्न केला. यावर संसदीयकार्य मंत्री गिरीश बापट यांनी ‘तुम्ही दोघे भांडू नका, कागदच बोलतील’ असे सांगून यूपीए सरकारने सनातन संस्थेवर बंदी घालण्याचे नाकारले असेल किंवा नसेल, ते समोर येईल असे सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषा

भारताची सुवर्णकन्या धावपटू पी. टी. उषा यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म. २७ जून १९६४ रोजी केरळ मधील कुथ्थाली या गावी झाला. पी.टी. उषा हे भारतीय...
Read More
post-image
मनोरंजन

अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने शेअर केला रोमॅण्टिक फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने काल आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिनी बॉलिवूडकडून तंच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर याच खास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत.यापैकी बहुतांश तेलंगणाचे रहिवासी आहेत. या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More