मंजुळा शेट्ये हत्याप्रकरण सुनावणी 30 एप्रिलपर्यंत स्थगित – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

मंजुळा शेट्ये हत्याप्रकरण सुनावणी 30 एप्रिलपर्यंत स्थगित

मुंबई – भायखळा जेलमधील वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी 30 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली. काही तांत्रिक कारणास्तव आज सोमवारी या खटल्याची सुनावणी होऊ शकली नाही. या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून याच जेलमधील कैदी भाग्यश्री मांडवकराची उलटतपासणी संपलेली आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती पुढच्या साक्षीदाराची. 23 जून 2017 च्या रात्री मंजुळा शेट्ये या महिला कैदीला अमानुष मारहाण करण्यात आली ज्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी एकूण 990 पानांचे आरोपपत्र दाखल झाले असून यात 182 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. ज्यात एकूण 97 कैद्यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. तर सीसीटीव्ही फुटेज हा या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असल्याचेही आरोपपत्रात नमुद करण्यात आले आहे. मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीश शायना पाटील यांच्या कोर्टात ही सुनावणी सुरू आहे. जेल अधीक्षक मनीष पोखरकरसह महिला जेल पोलीस बिंदू नाईकवडे, वसिमा शेख, शितल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या 6 जणांवर हत्येचा आरोप आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाच्या वाढदिवसाचे ‘हे’ फोटो पाहिलेत?

माले – अभिषेक-ऐश्वर्या या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध जोडीच्या लग्नाला शनिवारी तब्बल १२ वर्ष पूर्ण झाली. आपल्या लग्नाचा १२ वा वाढदिवस या दोघांनी मालदीवमध्ये साजरा केला....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान डाऊन जलद लाईनवर आज सकाळी 10.35...
Read More