#भ्रष्टआचार : कुणाचाही सल्ला नको, ‘बेबी केअर कीट’ तयार – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र लेख

#भ्रष्टआचार : कुणाचाही सल्ला नको, ‘बेबी केअर कीट’ तयार

महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील आदिवासी व ग्रामीण भागात दरवर्षी जन्माला येणार्‍या अंदाजे 12 लाख नवजात बालकांसाठी ‘बेबी केअर कीट’ देण्याची योजना जाहीर केली. एका बॅगेत लहान मुलीचे कपडे, टॉवेल, मच्छरदाणी, खुळखुळा, ब्लॅकेट अशा 16 वस्तू देण्यात येणार आहेत. यावर दरवर्षी किमान 100 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. नवजात बालकांच्या संख्येनुसार हा खर्च कमाल 240 कोटींपर्यंत जाऊ शकतो.

‘बेबी केअर कीट’ ही संकल्पना उत्तम आहे. मात्र याबाबत कोणत्याही विभागाशी सल्लामसलत न घेता, कोणत्याही राज्याचे अनुभव जाणून न घेता घाईने ही योजना तयार करण्यात आली. या कीटमध्ये दुधाची बाटली आणि वाटी-चमचा या वस्तूंचा समावेश केला होता. मात्र नवजात बालकाला बाटलीने अथवा चमच्याने दूध न देता स्तनपान महत्त्वाचे आहे असा आक्षेप सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतल्यानंतर या वस्तू कीटमधून वगळण्यात आल्या. मात्र या कीटमध्ये प्लॅस्टीक लंगोट, लिक्विड बॉडी वॉश, शॅम्पू या वस्तू आहेत. आरोग्य विभागाने यालाही आक्षेप घेत म्हटले आहे की, नवजात बालकाला काही महिने डायपर घालू नये. त्याचबरोबर बालकाला कमीत कमी सात दिवस आंघोळ घालू नये. असे असताना प्लॅस्टिक लंगोट, शॅम्पू, बॉडी वॉश देताना पालकांना या बाबी समजावून सांगण्यासाठी कोणतीही योजना केलेली नाही. परिणामी अज्ञानातून आदिवासी व ग्रामीण भागात या वस्तू अयोग्य पद्धतीने वापरल्या जाण्याचा धोका आहे. ‘बेबी केअर कीट’ मध्ये कोणत्या वस्तू असाव्या याचा निर्णय घेताना रुग्णालये, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग, लहान मुलांसाठी प्रचंड काम करणारी युनिसेफ संस्था यापैकी कुणाचाही सल्ला घेतला गेला नाही. या संस्थांचा आणि विभागाचा सल्ला घ्यावा, असे सुचविण्यात आल्यावर अशा सल्ल्याची गरज नाही असे महिला व बालविकास विभागाने कळविले.

आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा या तीन राज्यांत यापूर्वीच ‘बेबी केअर कीट’ देण्याची योजना राबवली जात आहे. या तीन राज्यांत जी कीट दिली जाते त्यात कोणत्या वस्तू आहेत. त्या राज्यांना ही योजना राबविताना काय अनुभव आला याची माहिती घ्या, असेही महिला व बालविकास विभागाला सांगण्यात आले. मात्र महाराष्ट्र आणि या तीन राज्यांची भौगोलिक वैशिष्ट्ये वेगळी असल्याने माहिती घेण्याची गरज नाही असे उत्तर महिला व बाल विकास विभागाने दिला. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षांसाठी राबवून बघावी हा सल्लाही धुडकावण्यात आला. अशा स्थितीतच राज्य योजना म्हणून ही योजना सुरू करून दरवर्षी 100 कोटी रुपयांची तरतूद केली गेली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजनाथ सिंह आज ‘तेजस’मधून उड्डाण करणार

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करणार आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री...
Read More
post-image
News मुंबई

मेट्रोच्या कारशेडसाठी कांजूरची जागा का नको-हायकोर्ट

मुंबई – मुंबईतील संवेदनशील आरे कॉलोनीतील हजारो झाडांचा बळी घेऊन आणि पर्यावरणाचा र्‍हास करून मेट्रो कारशेड उभारण्या ऐवजी कांजूरमार्ग येथे मोकळ्या जागेचा पर्याय म्हणून...
Read More