भोसरी एमआयडीसीतील बंद कंपन्यांना भीषण आग – eNavakal
अपघात आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भोसरी एमआयडीसीतील बंद कंपन्यांना भीषण आग

पिंपरी, ता. ६ – भोसरी एमआयडीसीतील टी ब्लॉक येथे ट्रान्सपरंट एनर्जी सिस्टिम्स प्रा. ली. आणि भिडे अँड सन्स या कंपन्यांना आग लागली. आगीमध्ये कंपनीतील कागदपत्रे, संगणक आणि अन्य सर्व साहित्य जळून खाक झाले. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली.

अग्निशमन विभागाचे अधिकारी ऋषिकांत चिपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठच्या सुमारास सुभाष गायकवाड नावाच्या व्यक्तीने भोसरी एमआयडीसी मधील टी ब्लॉकमधील दोन कंपन्यांना आग लागल्याची माहिती दिली. त्यानुसार पिंपरी अग्निशमन विभागाचे दोन, प्राधिकरण एक, भोसरी एक असे एकूण चार बंब घटनास्थळी दाखल झाले. तीन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. कंपनी बंद असल्यामुळे कंपनीतील कोणीही कर्मचारी अथवा अधिकारी यांची भेट झाली नाही. आग दुस-या मजल्यावर लागली असल्याने आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कंपनीच्या वतीने माहिती देण्यासाठी घटनास्थळी कोणीही उपस्थित नसल्याने आर्थिक नुकसान किती झाले, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

वाकोल्यातील गुजराल इमारतीला आग

मुंबई – वाकोल्यातील गुजराल इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

गोविंदाच्या ‘रंगीला राजा’चा ट्रेलर पाहिलात?

मुंबई – अभिनेता गोविंदाचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘रंगीला राजा ही दोन भावांची गोष्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश हवामान

उत्तराखंडमध्ये गारांसह बर्फवृष्टी

देहरादून – उत्तराखंडमध्ये मागील अनेक दिवसांपासून हवामान सतत बदलत आहे. आजही सकाळपासून हिमालयाच्या उंच पर्वत रांगेवर जोरदार पाऊस कोसळत आहे. बदरीनाथमध्ये बर्फवृष्टी होत आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

मॅच फिक्सिंगप्रकरणी ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरची कबुली

लाहोर – पाकिस्तानी डावखुरा गोलंदाज दानिश कनेरियाने मॅच फिक्सिंगचे आरोप स्विकारले आहेत. मॅच फिक्सिंग प्रकरणात त्याचा सहखेळाडू मर्वेन वेस्टफील्डला तुरुंगवास भोगाावा लागला. कनेरियाने तब्बल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

तब्बल ५० कोटी मोबाईल नंबर बंद होणार?

नवी दिल्ली – देशातील जवळपास ५० कोटी मोबाईलधारकांचे सिम ‘डिस्कनेक्ट’ होण्याची शक्यता आहे. खासगी कंपन्या मोबाइल सिम कार्ड पडताळणीसाठी आधारचा वापर करू शकत नाहीत, असा निर्णय...
Read More