भोसरीत अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड – eNavakal
महाराष्ट्र

भोसरीत अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

पिंपरी – भोसरीमधील आदिनाथ नगर परिसरात आठ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आदिनाथ नगर परिसरात रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वारंवार घडणाऱ्या वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. गुन्हा नोंदविण्याचे काम अद्याप सुरू आहे.

दरम्यान, गेल्या सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भोसरीमधील गव्हाणे वस्ती येथे 16 जणांच्या टोळक्याने 18 वाहनांची तोडफोड केली होती. तोडफोड करण्यात आलेल्या वाहनांमध्ये 16 कारचा समावेश होता, याप्रकरणी भोसरी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले होते. यानंतर लगेच आठ दिवसांनी आणखी एक तोडफोडीचा प्रकार समोर आला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News क्रीडा देश

विश्वचषक स्पर्धेत भारताला चांगला खेळ करावा लागेल-राहुल द्रविड

मुंबई – आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद मिळवायचे असेल तर भारताला चांगला खेळ करावाच लागेल, असे भारताचा माजी कर्णधार आणि जुनिअर भारतीय संघाचे मुख्य...
Read More
post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू

दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मादी आणि एका नर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईच्या कळंब समुद्रात 5 जणांना जलसमाधी

वसई – वसई तालुक्याच्या कळंब समुद्रकिनारीवर होळी- रंगपंचमी साजरी करण्यासाठी आलेल्या पाच जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली. एकाचा मृतदेह...
Read More