भूषण स्टील कंपनीचे माजी प्रोमोटर नीरज सिंघलला अटक – eNavakal
गुन्हे देश

भूषण स्टील कंपनीचे माजी प्रोमोटर नीरज सिंघलला अटक

नवी दिल्ली – भूषण स्टील लिमिटेडचे (बीएसएल) माजी प्रोमोटर आणि माजी व्यवस्थापकीय संचालक नीरज सिंघल याला सीरियस फ्रॉड इन्वेस्टिगेशन ऑफिस (एसएफआयओ)ने आज अटक केली आहे. भूषण स्टील कंपनीच्या बँक खात्यातील तब्बल २००० करोड रुपये विविध कंपन्यांसाठी वापरल्याचा आरोप नीरज सिंघलवर करण्यात आला आहे.

भूषण स्टील लिमिटेडने आपल्या 80 सहयोगी कंपन्यांमार्फत सार्वजनिक बॅंकांमधून 2000 करोड रुपयांचे कर्ज घेतले आणि सिंघल यांने इतरत्र ही रक्कम वापरल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नीरज सिंघल याला गुरुवारी अटक करण्यात आली आणि न्यायालयासमोर हजर करण्यात आले. 14 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी एसएफआयओ भूषण स्टील ग्रुपच्या इतर कंपन्यांची तपासणी करीत आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

चार मराठी चित्रपटांची महिनाभरात 50 ते 60 कोटींची कमाई

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. …आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, नाळ, मुळशी पॅटर्न आणि मुंबई-पुणे-मुंबई 3 या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला....
Read More
post-image
News मुंबई

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ

मुंबई,- राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवत देण्यात आलेल्या मुदतवाढीचे राज्य सरकारने आज समर्थन केले. त्यांना दिलेली मुदतवाढ ही राज्य आणि केंद्र सरकारने...
Read More
post-image
क्रीडा

बेलेच्या गोलामुळे माद्रिदचा विजय

माद्रिद – स्पॅनिश साखळी फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य रियल माद्रिदने बेलेने नोंदवलेल्या एकमेव गोलांच्या जोरावर शानदार विजय मिळवला. माद्रिदने आपल्या साखळी लढतीत तळाला असलेल्या ह्यूसेका...
Read More
post-image
Uncategoriz

मुंबई विमानतळावरून 24 तासांत तब्बल 1004 विमाने ये-जा झाली

मुंबई – सर्वाधिक वर्दळ असलेला विमानतळ म्हणजे मुंबई विमानतळ. स्वतःचाच विक्रम मुंबई विमानतळाने पुन्हा एकदा मोडीत काढला, 8 डिसेंबरला 24 तासात मुंबई विमानतळावर 1004...
Read More
post-image
News देश

आरबीआयच्या निधीचा वापर करणे ही देशविरोधी कृती

नवी दिल्ली- उर्जित पटेल आरबीआयला वाचवण्याचा प्रयत्न करत होते म्हणून त्यांनी राजीनामा दिला. आपली कातडी वाचवण्यासाठी आरबीआयच्या राखीव निधीचा वापर करणे ही देशविरोधी कृती असल्याचे...
Read More