भूमाता ब्रिगेडच्या उपाध्यक्षांची कुर्‍हाडीने घाव घालून हत्या – eNavakal
News महाराष्ट्र

भूमाता ब्रिगेडच्या उपाध्यक्षांची कुर्‍हाडीने घाव घालून हत्या

कोल्हापूर – भूमाता बिग्रेडच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षा माधुरी शिंदे (40) यांची आज त्यांच्या पतीनेच हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिरोळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या अशी माधुरी शिंदे यांची ओळख होती. पतीने कुहार्‍डीचे मानेवर आणि गळ्यावर 4 वार करून त्यांची हत्या केली. चारित्र्याच्या संशयावरून हा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मुलीने फिर्याद दिली असून आरोपी पती सुर्यकांत शिंदे हा स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला होता.पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
माधुरी शिंदे या शिरोळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या होत्या. भूमाता बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या संघटनेच्या त्या कोल्हापूर जिल्ह्याच्या उपाध्यक्षा होत्या. शिरोळ तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या छत्रपती गृपच्याही त्या उपाध्यक्षा होत्या. या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून माधुरी शिंदे यांचा तालुक्यात सतत सामाजिक कार्यात वावर होता. मात्र त्यांचे हे काम मोलमजुरी करणारे त्यांचे पती सूर्यकांत यांना मान्य नव्हते. त्यातून पती आणि पत्नीमध्ये सातत्याने भांडणे व्हायची.
आज सकाळी माधुरी या घरकाम करत असताना सूर्यकांत हे बाहेरून घरी आले. त्यांनी येताना कुर्‍हाड सोबत आणली होती. बेभान झालेल्या सूर्यकांत यांनी माधुरी यांची मान, गळा आणि डोक्यात 4 वार केले. ते इतके वर्मी होते कि त्यातच माधुरी यांचा अंत झाला. खून केल्यानंतर सूर्यकांत यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा केल्याची कबुली दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम        

अखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप

मुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...
Read More