भूमकर चौक दररोज आठ तास ‘ठप्प’ – eNavakal
News महाराष्ट्र

भूमकर चौक दररोज आठ तास ‘ठप्प’

पिंपरी – अरुंद रस्ते, वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे भूमकर चौकात दररोज सकाळी आठ ते बारापर्यंत तसेच सायंकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत अशी दररोज आठ तास वाहतूककोंडी होत आहे. जागतिक नकाशावर पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक क्षेत्र म्हणून ख्याती असली तरी ढिसाळ व लालफितीच्या कारभारामुळे चाकण, तळवडे, पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 35 लाखांहून अधिक रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ
आली आहे.
चाकण, भोसरी, तळवडे परिसरात इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक, आयटी हब काही हजार मोठे, मध्यम व लघुउद्योग क्षेत्रात काही लाख कामगार काम करतात. तसेच, हिंजवडी आयटी पार्कमध्ये शेकडो कंपन्या कार्यरत आहे. देश परदेशातील अनेक उद्योजक, कंपनी प्रतिनिधी कामानिमित्ताने शहरात ये-जा करीत आहेत. औद्योगिक क्षेत्रामुळे शहराचे जगभरात नाव असले तरी, वाहतुकीच्या गलथान व्यवस्थापन व राज्य व केंद्र सरकारच्या लालफितीच्या कारभारामुळे त्याचा त्रास प्रवासी, कामगार, अभियंते यांना मोठ्या प्रमाणात होत आहे.
भूमकर चौकामध्ये डाव्या बाजूला सातारा, बंगळूरकडे जाणारा अरुंद रस्ता आहे. उजव्या बाजूला ताथवडे, बालाजी कॉलेज, डी. वाय. पाटील कॉलेज, शाहू कॉलेज, जेएसपीएम कॉलेजकडे जाणारा 15 फुटी रस्ता, पुलाच्या बोगद्याच्या उजव्या बाजूला मुंबईकडे जाणारा व डाव्या बाजूने बंगळूर-सातारा मार्गावरून पिंपरी-चिंचवड शहरात येणारा अरुंद रस्ता आहे.परिणामी वाहतुकीची कोंडी होते. या दैनंदिन भेडसावणार्‍या प्रश्नावर संबंधित प्रशासनाने योग्य ती ठोस कारवाई करून तोडगा काढावा अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा चिंचवड प्रवासी संघाने दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, एन. डी. भोसले, निर्मला माने, मुकेश चुडासमा, संभाजी बारणे, हार्दिक पटेल यांनी निवेदन पाठविले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या बी777 फ्लाइट ए-191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More