भूज-दादर एक्सप्रेसमध्ये महिलेची हत्या – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

भूज-दादर एक्सप्रेसमध्ये महिलेची हत्या

मुंबई – भूज दादर एक्सप्रेसमध्ये एका ४० वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळला आहे. गुजरातवरून येणाऱ्या ४० वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. दादीया देवी असे या मृत महिलेचे नाव आहे. महिलेच्या अंगावरील दागिने तसेच इतर सामानही गायब होते. लुटीच्या उद्देशाने महिलेची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ही महिला सूरत स्थानकात चढली. बोरिवली ते दादर दरम्यान महिलेची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

कळंबोलीत बॉम्बसदृश्य वस्तू ठेवणारा संशयीत सीसीटीव्हीत कैद

नवी मुंबई- कळंबोलीमध्ये सापडलेल्या बॉम्बसदृष्य वस्तूचा काल मध्यरात्री रोडपाली परिसरामध्ये स्फोट घडविण्यात आला. सिमेंटच्या बॉक्समध्ये सापडलेल्या सर्व वस्तू तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या आहेत. शाळेसमोर बॉम्बसदृष्य...
Read More
post-image
News देश

केंद्राने 15 भ्रष्ट आणि कामचुकार अधिकार्‍यांना दाखवला घरचा रस्ता

नवी दिल्ली-  मोदी सरकारच्या कामकाजाला सुरुवात होऊन अजून एक महिना झालेला नाही. तोच सरकारने कडक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आयकर विभागानंतर केंद्र सरकारने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More