भूखंडावरील दोन्ही विषय बेस्टच्या बैठकीत पुढे ढकलले – eNavakal
News मुंबई

भूखंडावरील दोन्ही विषय बेस्टच्या बैठकीत पुढे ढकलले

मुंबई – सध्या देशभर लोकसभा निवडणुकांचे रणसंग्राम सुरु आहे. त्यातच निवडणुकीची आचरसंहिता लागू असल्याने कोणतेही निर्णय घेता येत नाही. आज झालेल्या बेस्ट समिती बैठकीतही आरक्षित भूखंडावरील दोन विषयपुढे ढकलण्यात आले.
बेस्ट समिती सदस्यांची आज बैठक पार पडली. अनिल पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच बैठक होती. या बैठकीला समिती सदस्य सुनिल गणाचार्य, आशिष चेंबुरकर, अनिल कोकीळ, दत्ता नरवणकर, राम गायकवाड, सुनिल अहिर, नाना आंबोले, श्रीकांत कवठणकर, महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे आदी उपस्थित होते. यावेळी कांदरपाडा दहिसर (पश्चिम) येथील बेस्ट उपक्रमाच्या बस आगाराच्या विस्तारासाठी आरक्षित भूखंड बसस्थानकाचे बांधकाम करण्यासह वाणिज्यिकदृष्ट्या वापरार्थ विकसित करण्याबाबत आणि वाणिज्यिक निवासी प्रयोजनार्थ, बेस्ट नगर, ओशिवरा, गोरेगाव (पश्चिम) येथील पोट-विभागणी करण्यात आलेला भूखंड क्र.2 ए विकसित करण्याबाबत हे दोन विषय चर्चेला आले. मात्र चर्चेदरम्यान हे दोन्ही विषय पुढे ढकलण्याचा निर्णय समिती सदस्यांनी घेतला. त्यानुसार लोकसभा निवडणुकीनंतरच हे विषय पुढील बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाच्या वाढदिवसाचे ‘हे’ फोटो पाहिलेत?

माले – अभिषेक-ऐश्वर्या या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध जोडीच्या लग्नाला शनिवारी तब्बल १२ वर्ष पूर्ण झाली. आपल्या लग्नाचा १२ वा वाढदिवस या दोघांनी मालदीवमध्ये साजरा केला....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान डाऊन जलद लाईनवर आज सकाळी 10.35...
Read More