भीषण पाणी टंचाईमुळे लातूरकर बाप्पाचे विसर्जन करणार नाही – eNavakal
महाराष्ट्र

भीषण पाणी टंचाईमुळे लातूरकर बाप्पाचे विसर्जन करणार नाही

लातूर – राज्यभरात बाप्पाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी सुरू असताना लातूरकरांवर मात्र बाप्पाचे विसर्जन न करण्याची वेळ आली आहे. विघ्नहर्ता पाण्याचे संकट दूर करेल अशी आशा येथील नागरिकांना होती, मात्र गणेशोत्सवाच्या दहा दिवसांतही पुरेसा पाऊस न पडल्याने याठिकाणी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गणेश भक्तांनी मूर्ती दान करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. विसर्जनावेळी ठरलेल्या मार्गावरून मिरवणुका काढाव्यात मात्र गणेश मूर्तीचे विसर्जन करू नये, असे आदेश महापालिका उपायुक्तांनी नागरिकांना दिले आहेत.

लातूरमध्ये बहुतांश ठिकाणी विहिरी आणि धरणे कोरडे पडले असून ज्या ठिकाणी पाणी आहे ते राखून ठेवावे लागत आहेत. त्यामुळे घरगुती गणेशाचे विसर्जन न करता प्रत्येकाने वर्षभर मूर्ती घरीच ठेवावी आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोकांनी विनंती केल्यास त्यांना मूर्तीचे दान द्यावे किंवा जे गणेशाची मूर्ती तयार करतात अशा मंडळींना त्या मूर्ती दान कराव्यात. तसेच यापैकी काहीही शक्य न झाल्यास शेवटचा पर्याय म्हणून महापालिकेकडे गणपतीची मूर्ती दान करावी, मात्र शहरात कुठेही मूर्तीचे विसर्जन करू नये, असे महापालिकेने म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या शंभर वर्षांत पहिल्यांदाच एखाद्या शहरावर पाणी नाही म्हणून गणपतीचे विसर्जन न करण्याची वेळ आली नाही.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत घोळ अजूनही सुरुच

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसने आज दुपारी जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय आधीच...
Read More
post-image
News निवडणूक महाराष्ट्र

विधानसभेसाठी ‘आप’ची 8 जागांची पहिली यादी जाहीर

मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता आम आदमी पक्षानेही कंबर कसली आहे. आम आदमी पक्षाने आज आठ जागांसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. आपचे...
Read More