भीम आर्मी संस्थापक चंद्रशेखर आझाद यांचे आजपासून बेमुदत उपोषण – eNavakal
आंदोलन देश मुंबई

भीम आर्मी संस्थापक चंद्रशेखर आझाद यांचे आजपासून बेमुदत उपोषण

मुंबई -अट्रॉसिटी कायद्यासंदर्भात देशभरात झालेल्या भारत बंद दरम्यान देशातील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासोबतच मृत भीमसैनिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच या सर्व प्रकरणाची विशेष चौकशी पथकामार्फत करावी यामागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशनचे संस्थापक ऍड . चंद्रशेखर आझाद यांनी आजपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला आहे , उत्तर प्रदेशातील सहारनपूर कारागृहात ते हे उपोषण आंदोलन करीत असून जोपर्यंत आपल्या मागण्या होणार नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे .

एड चंद्रशेखर आझाद हे मागील दहा महिन्यापासून सहारनपूरकारागृहात आहेत . ऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने २० मार्च रोजी दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत देशभरातील अनुसूचित जाती जमातीच्या संघटनांनी २ एप्रिल रोजी भारत बंदचे आवाहन केले होते या बंदमध्ये देशभरातील बहुजन समाज सहभागी झाला होता मात्र यावेळी विविध ठिकाणी १० आंदोलकांचा मृत्यू झाला तर हजारो लोकांवर उत्तर प्रदेश तसेच देशभरातील पोलीस प्रशासनाने खोटे गुन्हे टाकून त्यांना कारागृहात टाकले असल्याचा आरोप ऍड चंद्रशेखर आझाद यांनी सहारनपुर जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केला आहे . हे गुन्हे मागे घेऊन त्यांना कारागृहातून मुक्त करण्यात यावे, मृत आंदोलकांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी तसेच या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणीही आझाद यांनी केली आहे या मागणीसाठी ते आजपासून सहारनपूर कारागृहात बेमुदत आंदोलन करणार आहेत

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने शेअर केला रोमॅण्टिक फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने काल आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिनी बॉलिवूडकडून तंच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर याच खास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत. दरवर्षी शेकडो भारतीय भाविक शंकराच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 आज भारतासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होणार आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More