भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण! नवलखांना हायकोर्टाचा दणका – eNavakal
News महाराष्ट्र मुंबई

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण! नवलखांना हायकोर्टाचा दणका

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवादी असल्याचा संशय असल्याने वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. गौतम नवलखांविरोधात तपासयंत्रणेने सादर केलेल्या काही पुराव्यांसदर्भात अधिक तपास होणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने नवलखा यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली. मात्र आपल्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी म्हणून न्यायालयाने निर्णयाला तीन आठवड्याची स्थगिती देत तोपर्यंत गौतम नवलखा यांना अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवला.
माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी आपल्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करुन घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर आज न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय न्यायालयाने आज दिला. नवलखांच्यावतीने युक्तीवाद करताना युग चौधरी यांनी नवलखांविरोधात पोलिसांकडे कोणताही ठोस पुरावा नाही. त्यांनी बोललेली किंवा केलेली कोणतीही गोष्ट त्यांच्या विरोधात जात नाही. केवळ दुसर्‍यांनी लिहिलेल्या मजकूरात उल्लेख झाल्याचा संशय आहे. म्हणून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करता येणार नाही, असा दावा केला होता. तर देशातील माओवादी संघटनांचे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ‘हिजबुल मुजाहिद्दीन’सोबत थेट संबंध आहेत आणि याचसंदर्भात गौतम नवलखांचीही महत्त्वाची भूमिका असल्याचा खळबळजनक आरोप करत राज्य सरकारच्यावतीने अ‍ॅड. अरूणा कामत-पै यांनी काही पुरावे न्यायालयात सादर केले होते. तसेच नवलखा यांनी काश्मिरमध्ये जाऊन फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याचे पुरावेही कोर्टात सादर केले. नक्षलवाद्यांशी
चर्चेत वेळोवेळी सरकारची मदत केल्याचा दावा करणार्‍या गौतम नवलखा यांनी नेहमीच नक्षलवाद्यांची बाजू घेतली आहे, असा आरोपही करून नवलखा यांची याचिका फेटाळावी अशी विनंती केली होती. न्यायालयाने राज्य सरकारचा दावा मान्य करत नवलखांविरोधात तपास यंत्रणेने सादर केलेल्या पुराव्यांची काही अंशी चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

बाबरी मशिदीसाठी मिळाली ‘ही’ जागा

अयोध्या- अयोध्येपासून ३० किमी दूर असलेल्या धन्निपूर येथे बाबरी मशिद बांधण्यास पाच एकर जमीन सुन्न वक्फ बोर्डाला देण्यात आली आहे. ही जागा स्विकारण्याचा निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी- अण्णा हजारे

अहमदनगर – फक्त गावचे सरपंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. सरपंच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

#TrumpInIndia ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह आज पहिल्यावहिल्या भारत भेटीवर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माळेगावचा पहिला निकाल, अजित पवारांच्या पॅनलला यश

बारामती -अतितटीच्या ठरलेल्या माळेगाव कारखानच्या निवडणुकीत ब वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्वप्नील जगताप यांनी विजय मिळवला आहे. अन्य २० जागासाठी मतमोजणी सुरू आहे. माळेगाव कारखान्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जयसिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात

सोलापूर – सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराजांच्या जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीने हा दाखला बनावट असल्याचे सांगत रद्द केला. त्यामुळे...
Read More